2024 लोकसभा निवडणूक: BJP-शिंदेंसाठी धोक्याची घंटा, मविआ मारणार मोठी मुसंडी?

मुंबई तक

2024 lok sabha elections: 2024 लोकसभा निवडणुकीत BJP आणि शिंदेंच्या शिवसेनेला मविआपेक्षाही कमी मतं मिळू शकतात. असं नुकतंच एका सर्व्हेतून समोर आलं आहे. त्यामुळे युतीसाठी ही धोक्याची घंटा आहे.

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखाली भाजपने (BJP) 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) आतापासूनच कंबर कसली आहे. मात्र, या आगामी निवडणुकीत महाराष्ट्र हे भाजप आणि मोदींसाठी अत्यंत महत्त्वाचं राज्य ठरणार आहे. खासदारांच्या दृष्टीने देशात दुसरं मोठं राज्य हे महाराष्ट्रच (Maharashtra) आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेमका कौल हा लोकसभा निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. याचबाबत सकाळ माध्यम समूहाने नुकताच एक सर्व्हे केला आहे. हाच सर्व्हे भाजपसाठी धोक्याची घंटा देणारा असल्याचं सध्या दिसत आहे. (2024 lok sabha elections threat event for bjp shinde mva will hit a big blow)

साधारण वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केली आणि भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. मात्र, यावेळी झालेल्या एकूण राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे ढवळून निघालं आहे आणि त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील मतदारांवर झाला आहे. यामुळेच नुकत्याच झालेल्या सर्व्हेतील महाराष्ट्रातील जनतेची मतं ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सर्व्हेनुसार राज्यातील जनतेने नेमका काय कौल दिलाय हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

सर्व्हेतील महत्त्वाचे मुद्दे:

2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष निवडून येईल?

जर लोकसभा निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडी अभेद्य राहिली आणि जागांबाबत योग्य बोलणी पार पडली तर त्याचा थेट फायदा हा मविआला होऊ शकतो. कारण या सर्व्हेनुसार राज्यात पुन्हा महाविकास आघाडी भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्या पुढे जाताना दिसत आहे.

सर्व्हेनुसार मविआला एकूण 47.7 टक्के एवढं मतं मिळू शकतात. ज्यामध्ये काँग्रेसला 19.9 टक्के, राष्ट्रवादीला 15.3 टक्के आणि शिवसेना (ठाकरे गट) 12.5 टक्के मिळतील. म्हणजेच राज्यातील जनतेची मविआला पसंती असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या टक्केवारीची बेरीज केल्यास ती फक्त 39.3 टक्के एवढीच दिसून येत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp