भाजप नेते किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह Video व्हायरल, विरोधकांची भाजपवर तुफान टीका
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक कथित आक्षेपार्ह Video व्हायरल झाला आहे. ज्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी आता भाजपवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया मात्र अद्याप समोर आलेल्या नाहीत.
ADVERTISEMENT

मुंबई: भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक व्हिडिओ चॅट समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. ‘लोकशाही’ या वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे. ज्यानंतर आता विरोधी पक्षातील नेते अत्यंत आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्या यांचे असे आक्षेपार्ह व्हिडीओ असल्याचा दावा देखील या वृत्तवाहिनीने केला आहे. सोमय्यांबाबतचे हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आता संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या संपूर्ण मुद्द्यावरुन एकीकडे विरोधी पक्षातील नेते आक्रमक झालेले असले तरी भाजपकडून कोणत्याही नेत्याचा प्रतिक्रिया अद्याप समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाबाबत भाजप नेते काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

‘त्या’ Video वरुन विरोधकांचा सोमय्यांसह भाजपवर तुफान टीका
साधनशुचेतीच्या गप्पा मारणाऱ्या भाजपने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी- अंबादास दानवे (विरोधी पक्ष नेते)
‘खरं तर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे अनेक प्रकरणात त्यांनी ईडीकडे वेगवेगळ्या लोकांच्या तक्रारी केल्या आहेत. ईडी यांच्या तालावर नाचते असंही आम्ही ऐकतो. साधनशुचेतीच्या गप्पा मारणाऱ्या नेत्याचा हा व्हीडिओ आता समोर येतोय. आता वकील साहेब म्हटले असतील की, तो… ज्याचा त्याचा खासगी विषय आहे. परंतु मला वाटतं की, त्यांना नैतिकता, परंपरा.. हे विषय आहे की नाही?’