Anjali Damania : ‘शिंदे-फडणवीसांनी भुजबळांना पैसै देण्यास भाग पाडले’, फर्नांडिसांना का द्यावे लागले साडे आठ कोटी?

मुंबई तक

पवार कुटुंबाबाबत माझी टोकाची भूमिकी होती. मात्र या प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून सुप्रिया सुळे यांनी माझी मदत केली आहे, त्यामुळे त्यांचे खूप मनापासून आभार असे अंजली दमानिया यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

anjali damania big revealation about fernandez case chhagan bhujbal devendra fadnavis ekanath shinde
anjali damania big revealation about fernandez case chhagan bhujbal devendra fadnavis ekanath shinde
social share
google news

Anjali Damania Big revealation about fernandez case : अभिजीत करंडे  :  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी फर्नांडीस (fernandez case) कुटुंबियांच घर लाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला होता. या प्रकरणात फर्नांडिस कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी अंजली दमानिया तब्बल 20 वर्ष लढा दिला होता. अखेर या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना समज देऊन पैसै देण्यास भाग पाडल्यामुळे या लढ्याला यश आल्याचा खळबळजनक खुलासा अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीसांमुळे फर्नांडिस कुटुंबियांना आता साडे आठ कोटीची रक्कम मिळाली आहे. दरम्यान हे नेमके प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात. (anjalai damania big revealation about fernandez case chhagan bhujbal devendra fadnavis ekanath shinde)

सांताक्रूझमध्ये फर्नांडिस कुटुंबियांचा एक बंगला होता. तो 1994 ला रहेजाला पुनर्बाधणी करायला दिला होता. त्या बंगल्याच्या बदल्यात फर्नांडिस कुटुंबियाला पाच फ्लॅट मिळणार होते. मात्र फर्नांडिस कुटुंबियांच्या जागेवर छगन भुजबळांनी निवासस्थान बांधले होते. या जागेच्या मोबदल्यात भुजबळांनी फर्नांडिस कुटुंबियांना एक रूपयाचा मोबदला दिला नसल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. या प्रकरणी नोव्हेंबर महिन्यात अंजली दमानिया यांनी भुजबळांच्या बंगल्याबाहेर पत्रकार परिषद घेण्याचाही इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी त्यांना अटकाव केला होता. अखेर इतर ठिकाणाहून पत्रकार परिषद घेऊन दमानिया यांनी भुजबळांवर गंभीर आरोप केले होते.

हे ही वाचा :

दरम्यान या प्रकरणात आता तब्बल 20 वर्षानंतर फर्नांडिस कुटुंबियाला न्याय मिळाला आहे. अंजली दमानिया यांनी फेसबूक पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भूजबळांना समज देऊन पैसै देण्यास भाग पाडल्याचा खुलासाही अंजली दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी यावेळी फर्नांडिस यांच्या पासबूकचा फोटोही शेअर केला आहे. या फोटोत 14 डिसेंबरला 4 कोटी आणि 18 डिसेंबरला 4 कोटी 41 लाख 50 हजार बँकेत जमा झाल्याचे सांगितले आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीसांमुळे तब्बल साडे आठ कोटी फर्नांडिस कुटुंबियांना मिळाले आहेत. दमानिया यांनी शिंदे-फडणवीसांचे आभार मानले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp