MP Chief Minister: मोहन यादवांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची कशी मिळवली? वाचा Inside Story
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदी कोण बसणार असा प्रश्न अनेकांना पडला होता, मात्र आता मोहन यादव यांच्या गळ्यात माळ पडल्यानंतर त्यावर आता पडदा पडला आहे. मात्र त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. विद्यार्थीदशेपासन राजकारणात सक्रिय असणाऱ्या मोहन यादव यांनी अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती.
ADVERTISEMENT

CM Moham Yadav: मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री (Madhya Pradesh) म्हणून आता मोहन यादव यांच्या गळ्यात माळ पडली. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण त्याहीपेक्षा धक्कादायक हे आहे की, त्यांचा मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास. या सगळ्या आधी भाजप कार्यालयात नवनिर्वाचित आमदार आणि केंद्रीय निरीक्षकांचे फोटो सेशन पार पडले होते. भाजपचे अनेक बडे नेते या फोटो सेशनसाठी उपस्थित होते, मात्र डॉ.मोहन यादव (Dr. Mohan Yadav) अगदी मागच्या रांगेत बसले होते. त्यामुळे आता मोहन यादव यांच्यावर पक्ष एवढी मोठी त्यांच्यावर जबाबदारी सोपवेल याचेच सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे.
चौहान यांनीच ठेवला प्रस्ताव
भाजपच्या या फोटो सेशनमध्ये मोहन यादव हे तिसऱ्या रांगेत बसले असले तरी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मात्र त्यांनी सगळ्यांनाच मागे टाकलं आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीच मुख्यमंत्रिपदासाठी मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव हायकमांडसमोर ठेवला होता. त्यानंतरच विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत यादव यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.
हे ही वाचा >> MLA Disqualification Case : “तसं करून आपण अपात्रतेची कारवाई ओढवून घेतली आहे”
राजकारणातील दबदबा
मोहन यादव हे उज्जैन दक्षिणचे आमदार आहेत. ते संघाच्या जवळचे मानले जाते. शिवराज सरकारमध्ये ते उच्च शिक्षणमंत्री होते. तर 2013 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी उज्जैन दक्षिण मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. मार्च 2020 मध्ये शिवराज सरकारच्या पुनर्स्थापनेनंतर जुलैमध्ये त्यांचा मंत्रिमंडळात समावेशही करण्यात आला. तर 2 जुलै 2020 रोजी शिवराज सिंह चौहान मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात त्याचा दबदबा वाढत गेला.
काँग्रेस नेत्याचा केला पराभव
मोहन यादव यांचा जन्म 25 मार्च 1965 रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे झाला. ते अनेक वर्षे भाजपसोबत होते. त्याचबरोबर ते सलग तिसऱ्यांदा आमदारही झाले आहेत. उज्जैन दक्षिण मतदारसंघातून भाजपचे मोहन यादव यांनी काँग्रेसचे चेतन प्रेम नारायण यांचा 12941 मतांनी पराभव केला होता.










