BJP vs Shivsena : ‘त्यांच्याकडे धनुष्यबाण तर माझ्याकडे रॉकेट’, भाजप आमदाराच्या वक्तव्याने शिवसेना आवाक

मुंबई तक

MLA Ganpat Gaikwad : कल्याणमधील भाजपच्या कार्यक्रमामध्ये आणि मंत्री मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित असतानाच आमदार गणपत गायकवाड यांनी जोरदार हल्लाबोल चढविला आहे. भाजपच्या आमदाराने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर टीका केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

ADVERTISEMENT

bjp mla ganpat gaikwad criticize shivsena cm eknath shinde state government funds issue
bjp mla ganpat gaikwad criticize shivsena cm eknath shinde state government funds issue
social share
google news

MLA Ganpat Gaikwad : कल्याणमध्ये भाजपच्या कार्यकारणी नियुक्ती समारंभ चालू असतानाच आणि मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित असतानाच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आमदार गणपत गायकवाडी यांनी शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल करताना त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनवर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, आता धनुष्यबाणा पेक्षा रॉकेट पण चालतात. त्यांच्याकडे धनुष्यबाण आहे तर माझ्याकडेपण रॉकेट आहे असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

शिवसेनवर हल्लाबोल

मंत्री रवींद्र चव्हाण त्यांच्यासमोरच त्यांनी शिंदेच्या शिवसेनवर हल्लाबोल केल्याने त्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. निधीवरूनही त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. त्यामुळे कल्याणमध्ये गायकवाड विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार का असा सवालही उपस्थित केला जात आहे.

हे ही वाचा  >> Video : W,O,W,W,4,W…फायनल सामन्यात मोहम्मद सिराजची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

फाईल टेबल खाली दाबून ठेवल्या

आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर टीका करताना त्यांनी थेट इशाराच दिला आहे. बोलताना ते म्हणाले की, पुन्हा मला छेडण्याचा प्रयत्न केला गेला तर मी नाव घेऊन सांगणार आहे. त्यामुळे मी कुणाच्या बापाला बाप म्हणत नाही. विकासाच्या नावाखाली माझ्या निधीच्या फाईल कुणाच्या टेबल खाली दाबून ठेवल्या आहेत हे त्यावेळी सांगेन असा सूचक इशाराही त्यांनी या कार्यक्रमावेळी त्यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या लोकांची बेकायदाशीर बांधकामं

विकासाच्या मुद्यावरूनही त्यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. कल्याण पूर्वेसाठी 129 कोटींची मी मंजूर केलेली कामे आता दुसऱ्याच नावाने सुरू आहेत. तोच निधी आता दुसऱ्याच्या नावाने वापरला जात आहे. शिवसेनेच्या लोकांनी आरक्षीत भूखंडावर बेकायदाशीर बांधकामं केली आहेत. मात्र आता ती अनधिकृत बांधकामे हटवण्याची गरज आहे.

हे ही वाचा  >> Vishwakarma Yojana : स्टायपेंड… 3 लाख कर्ज; मोदींनी लॉन्च केलेली विश्वकर्मा योजना काय?

पोलिसांवर मोठा ताण

कारण गणशोत्सव आणि दिवाळी सण आता होणार आहेत. या सणांचा मोठा बंदोबस्त होण्यार असल्याने त्याचा पोलिसांवर मोठा ताण असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांची मदत नागरीकांना झाली पाहिजे. शिवसेनेच्या पदाधिकारी गुंडांना चार चार पोलीस दिले जात आहेत. त्यामुळेच यासंदर्भात आपण पोलिसांना मी पत्र दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

    follow whatsapp