Raver : पवार काका-पुतण्यानंतर सून विरुद्ध सासरा; एकनाथ खडसे उतरणार मैदानात
2024 च्या लोकसभा निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे भाजप, काँग्रेससह शिवसेनेचे दोन्ही गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटांनी पक्षाच्या बांधणीवर लक्ष्य केंद्रित केलं आहे.
ADVERTISEMENT

Raver Lok Sabha Constituency : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार विरुद्ध अजित पवार हे काका-पुतणे राजकीय मैदानात समोरासमोर आलेले असताना आता खान्देशातही एका कुटुंबात अशीच स्थिती उद्भवताना दिसतेय. राज्यात सर्वच राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून, आता महाराष्ट्रात सून विरुद्ध सासरा असं दृश्य प्रचारात बघायला मिळणार आहे. हे कुटुंब दुसरं तिसरं कुणाचं नसून, ते आहे एकनाथ खडसे यांचं. आगामी काळात रावेर मतदारसंघात नेमकं काय घडणार आहे, याबद्दल खडसेंनी सूचक विधान केलंय.
2024 च्या लोकसभा निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे भाजप, काँग्रेससह शिवसेनेचे दोन्ही गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटांनी पक्षाच्या बांधणीवर लक्ष्य केंद्रित केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना युबीटी) विरुद्ध महायुती (भाजप, शिवसेना, अजित पवार गट) अशीच लढत बघायला मिळणार आहे.
वाचा >> ’70 कोटींचं काय झालं’, उद्धव ठाकरे तापले! ‘कलंक’वरून मोदींवरही चढवला हल्ला
प्रत्येक मतदारसंघांचा आढावा सध्या घेतला जात असून, रावेर लोकसभा मतदारसंघात वेगळं दृश्य यावेळी बघायला मिळणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाणार, हे निश्चित नसले तरी याची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडे असणार आहे.
एकनाथ खडसे रावेर लोकसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
“महाविकास आघाडी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत चर्चा झालेली नाही. चर्चेमध्ये ज्या पक्षाकडे ही जागा येईल, त्या पक्षाचे जागा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करतील”, असं एकनाथ खडसे यांनी सांगितले.










