Maharashtra Politics: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे थेट ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरेंसोबत दीड तास खलबतं!
Sanjay Pande Meet Uddhav Thackeray : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली.
ADVERTISEMENT

Sanjay Pande Meet Uddhav Thackeray : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी भेट झाली. ही बैठक जवळपास दीड तास चालली. (Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey met Shiv Sena Thackeray group party chief Uddhav Thackeray)
महाराष्ट्रात उद्धव यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारच्या काळात संजय पांडे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. आता पांडे आणि ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. शुक्रवारी (20 ऑक्टोबर) रात्री उशीरा झालेल्या भेटीत संजय पांडे आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप समजलेलं नाही.
वाचा: Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियांनी जोडीदारांसोबतचे नाते तोडले, कारण…
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कडून कर्मचार्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंगशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात संजय पांडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने डिसेंबर महिन्यात जामीन मंजूर केला आहे. ईडीने जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जे 8 मे 2023 रोजी फेटाळण्यात आले.
ED ने पांडे यांना 19 जुलै 2022 रोजी, संजय पांडेंच्या निवृत्तीनंतर काही दिवसांनी अटक केली होती आणि 24 सप्टेंबर रोजी, CBI ने नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कर्मचारी प्रकरणात कथित बेकायदेशीर फोन टॅप प्रकरणी देखील अटक केली होती.