Shiv Sena : शिंदेंच्या नेत्यांमध्येच कुस्ती, कदमांविरोधात कीर्तिकरांनी थोपटले दंड
Ramdas kadam gajanan kirtikar news in Marathi : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर रामदास कदमांनी दावा केला. सिद्धेश कदम निवडणूक लढवणार असेही म्हटलं. त्याला आता गजानन कीर्तिकरांनी विरोध केलाय.
ADVERTISEMENT

Ramdas kadam Gajanan Kirtikar : राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप कसं होईल, असा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. कुणाला त्याग करावा लागणार आणि कुणाला जास्त जागा मिळणार, याबद्दलचे चित्र अजूनही स्पष्ट नाही. तर दुसरीकडे शिंदेंच्या सेनेत मात्र नेत्यांची मतदारसंघासाठी कुस्ती सुरु झाल्याचे दिसत आहे. शिंदेंच्या सेनेतील दोन ज्येष्ठ नेते म्हणजे रामदास कदम आणि खासदार गजानन कीर्तिकर हे एकमेकांविरुद्ध आमने-सामने आलेत. (Gajanan Kirtikar Reply to Ramdas Kadam)
रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यात जुंपलीये ती मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून. झालं असं की, रामदास कदम यांनी दापोलीत माध्यमांशी बोलताना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार, याबद्दल एक विधान केले.
रामदास कदमांचं विधान काय?
“गजानन कीर्तिकर हे जर का उभे राहिले नाहीत, तर या लोकसभा मतदारसंघातून सिद्धेश कदम उमेदवारी मागतील आणि तो आपला हक्क आणि अधिकार आहे. पण, गजाभाऊ जर का इकडे उभे राहिले तर सिद्धेश कदम उभे राहणार नाही”, असं राजकीय भाष्य रामदास कदम यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून केले होते.
हे ही वाचा >> वेदनेने कासावीस, तरीही खेळला; मॅक्सवेलने मोडला कपिल देव यांचा विक्रम
रामदास कदम यांनी गजानन कीर्तिकर यांच्या मतदारसंघावरच दावा केला. इतकंच नाही, तर मुलगा सिद्धेश कदम हे मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असंही स्पष्ट केले. त्यांच्या या विधानानंतर खासदार गजानन कीर्तिकरांनी भूमिका मांडली आणि रामदास कदमांना चांगलंच सुनावलं.