‘राष्ट्रवादीने सेक्युलरिझमला फाटा दिला’, अजित पवारांचं मोठं विधान… मनात नेमकं काय?
शिवसेनेबरोबर सरकार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने सेक्युलरिझमला फाटा दिला असं वकव्य करत अजित पवार यांनी पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ माजवून दिली आहे.
ADVERTISEMENT

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपच्या (BJP) सोबत जाणार का या चर्चेला सातत्याने उधाण आलं आहे. असं असताना आता अजित पवारांनी एक अत्यंत मोठं आणि खळबळजनक विधान केलं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या राजकीय भूमिकेबाबत गूढ निर्माण झालं आहे. आपण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असं म्हणणाऱ्या अजित पवारांनी एक असं वक्तव्य केलं आहे की, ज्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ माजली आहे. (govt with shiv sena means ncp torn apart secularism is it ajit pawar ready to go with bjp again)
पुण्यात सकाळ वृत्तसमूहाच्या एका विशेष कार्यक्रमात अजित पवार यांची आज (21 एप्रिल) जाहीर मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हटलं की, ‘2019 ला सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सेक्युलरिझमला फाटा दिला.’ आता त्यांच्या याच वाक्याचा अर्थ असाही लावला जात आहे की, अजित पवार हे भाजपसोबत जाण्यासाठी विशिष्ठ पार्श्वभूमी तर तयार करत नाही ना?
अजित पवार नेमकं काय म्हणाले:
सकाळ वृत्तसमूहाच्या कार्यक्रमात अजित पवार यांना भाजपसोबत जाण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला त्याला अजित पवारांनी नेमकं काय उत्तर दिलं हे आपण आधी जाणून घेऊया.
हे ही वाचा>> “आता देवेंद्र फडणवीसांचा गळा धरू का?”, अजित पवारांचं उत्तर ऐकून…
प्रश्न: राष्ट्रवादीत असा कुठला दबाव गट आहे का, की भाजपसोबत गेलो तर स्थिर सरकार स्थापन करू शकू?