उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद कसं गेलं?, अजित पवारांनी सांगितली Inside Story
उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद कसं गेलं?, महाविकास आघाडी सरकार कसं कोसळलं या सगळ्याची माहिती स्वत: अजित पवारांनी पुण्यातील सांगितली आहे. वाचा नेमका किस्सा
ADVERTISEMENT

पुणे: राज्यात 2022 साली एक मोठा राजकीय भूकंप घडला आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं सरकारच कोसळलं. खरं तर त्यांच्याच पक्षाचे साधारण 40 आमदार हे त्यांच्यासमोरुन निघून गेले. ज्यामुळे उद्धव ठाकरेंना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. हे सगळं घडविण्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हात होता हे आता जगजाहीर झालेलं आहे. मात्र, हे सगळं नेमकं घडलं कसं याची Inside Story ही स्वत: विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितली आहे. (how did uddhav thackeray lose the post of chief minister ajit pawar told inside story)
पुण्यात सकाळ वृत्त समूहाच्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद कसं गेलं आणि त्यांचं सरकार कसं कोसळलं याचा नेमका किस्सा सांगितला आहे. जाणून घेऊयात त्याचविषयी.
उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद कसं गेलं?
‘राज्यातील सत्ताबदल हा काही अचानक झालेला नव्हता. इथे काही जणं आहेत ते साक्षीदार आहेत. थोडंसं कधीही एकनाथ शिंदे यांच्याबाबत काही गोष्टी कानावर यायच्या.. ते नाराज नंतर.. नंतर होते. त्यांच्या मनात काही वेगळं शिजत होतं हे आम्हाला कळत होतं. आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या ही गोष्ट कानावर घातली. आम्ही अनेकदा उद्धवजींच्या कानावर ही गोष्ट घातली. उद्धवजी म्हणायचे ठीकए… मी त्यांच्याशी बोलतो. पवार साहेब पण त्यांच्याशी बोलायचे. पण ते बोलून एखाद्याच्या मनात वेगळं काही तरी चाललेलं असेल आणि तुम्ही त्याला विचारलं काय रे… काही गडबड नाही ना.. तो म्हणाराय का.. नाही, नाही.. माझ्या मनात गडबड.. गडबड आहे.’
‘ते म्हणणारच ना.. काही गडबड नाही, काही काळजी करू नका. मी गावाकडे आलेलो आहे. शेती करतोय वैगरे, वैगरे..’










