Drugs वरून संजय राऊतांचं खळबळजनक विधान, ‘मुख्यमंत्र्यांचं कुटुंब ड्रग्स व्यवहारात…’

रोहित गोळे

Sanjay Raut vs Cm Eknath Shinde Elvish Yadav: एल्विश यादवच्या अटकेनंतर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवली आहे. यावेळी राऊतांनी अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

in elvish yadav drug case are cm eknath shinde family and political family involved in drug dealing controversial statement of sanjay raut
in elvish yadav drug case are cm eknath shinde family and political family involved in drug dealing controversial statement of sanjay raut
social share
google news

Sanjay Raut Accusation Cm Eknath Shinde over Elvish Yadav: मुंबई: ड्रग्स प्रकरणावरून सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. त्यातच एल्विश यादवच्या अटकेवरून मुख्यमंत्र्यांवर विरोधक अत्यंत आक्रमकपणे टीका करत आहेत. याच मुद्द्यावर शिवसेना (UBT)नेते संजय राऊत यांनी अत्यंत खळबळजनक असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. (in elvish yadav drug case are cm eknath shinde family and political family involved in drug dealing controversial statement of sanjay raut)

‘त्या व्यक्तीला ‘वर्षा’वर कोणी निमंत्रित केलेलं? मुख्यमंत्री निवासस्थानाशी काय संबंध आहे? काय मुख्यमंत्र्यांचं कुटुंब किंवा त्यांचं राजकीय कुटुंब ड्रग्स व्यवहारात सहभागी आहेत?’ असं खळबळजनक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

‘ड्रग माफिया मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपतीची आरती करतोच कसा?’

‘आपण पाहिलं असेल की, या देशाचा सर्वात मोठा ड्रग्स माफिया.. जो सापाचं विषही विकायचा आणि रेव्ह पार्टीत त्याचा वापरही केला जातो. तोच व्यक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जातो. त्याचं तिथे स्वागत केलं जातं. त्याच्या हाताने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपतीची आरती केली जाते. त्याचं जे स्वागत झालं भव्य.. मला जे वाटतं महाराष्ट्रात जो ड्रग्सचा व्यापार सुरू आहे मोठ्या प्रमाणात काय त्यांचे सूत्रधार सरकारमध्ये तर नाहीत?

हे ही वाचा>> Elvish Yadav : रेव्ह पार्टीचा बेत, 5 कोब्रा अन् विष; Bigg Boss एल्विशवर गुन्हा

‘मुख्यमंत्र्यांकडे इंटेलिजन्स नाही का? की त्यांच्या बंगल्यावर कोण येतो कोण जातो यासाठी.. जी माफियागिरी वाढली त्याचं केंद्रबिंदू हे मंत्रालयाचा सहावा मजला आहे.’ अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp