Jitendra Awhad : “शरद पवार हे पाण्यात रडणारा मासा, भुजबळ सुपारी घेतलेला पोपट”

भागवत हिरेकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अमोल कोल्हेंना दिलेल्या मुलाखतीत आव्हाड काय म्हणालेत… वाचा

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Jitendra Awhad To the Point Sharad pawar Ajit pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ, अजित पवार यांच्यावर तोफ डागली. आव्हाड यांनी खासदार अमोल कोल्हेंनी घेतलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीतील फुटीवर भाष्य करताना छगन भुजबळांना सुपारी घेतलेला पोपट म्हटले आहे. त्याचबरोबर अजित पवारांनाही आव्हाडांनी नव्याने आव्हान दिले आहे.

खासदार अमोल कोल्हे यांच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड बोलले आहेत. या मुलाखतीचा टीझर प्रदर्शित झाला आहे. आव्हाडांनी मुलाखतीत केलेल्या महत्त्वाच्या विधानांचा समावेश आहे.

हेही वाचा >> प्रकाश आंबेडकरांचा नवा प्रस्ताव, उद्धव ठाकरे ठाकरे कात्रीत! उरले फक्त दोनच पर्याय

“बाहेरच्यांनी द्रोह केला, तर तो द्रोह निपटून टाकता येतो. घरातल्या द्रोहाला करायचं काय?”, जितेंद्र आव्हाडांच्या या विधानाने व्हिडीओची सुरू होते.. त्यानंतर राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाजपसोबत तडजोडी करण्याच्या मुद्द्यावर बोलताना आव्हाड म्हणताहेत की,”ज्यांनी साहेबांचं (शरद पवार) राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी निगोशिएशन (चर्चा) होऊच शकत नाही.”

शरद पवार हे पाण्यात रडणारा मासा, आव्हाड नेमकं काय बोलले?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर शरद पवारांनाही वेदना होतात, असं सांगताना आव्हाडांनी पाण्यात रडणाऱ्या माशाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “दिल्लीला ज्यावेळी ते एकटे बसत असतील, तुम्हाला काय वाटतं हे हे विचार त्यांना सतावत नसतील. मी काय चुकलो, कुठे चुकलो, मी यांना काय कमी केले? पाण्यात पोहणारा मासा रडताना दिसतच नाही कुणाला. साहेबांच्या (शरद पवार) चेहऱ्यावर दुःख नाही म्हणजे त्यांना होत नाही असं वाटतं का? ते बोलून दाखवत नाही म्हणून त्यांना दुःख होत नाही, असं वाटत का?”, असं आव्हाड म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp