Maharashtra Political Crisis: बंडखोरी ते सेनेचा ताबा, शिंदेंनी कशी केली मात?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Political Crisis Chronology: मुंबई: राज्याच्या राजकारणात जून 2022 एक मोठी घडामोड घडली होती. ज्याचे परिणाम आजही महाराष्ट्रात (Maharashtra) पाहायला मिळत आहे. जून महिन्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (Shiv Sena) सुमारे 40 आमदारांसह महाराष्ट्रातून थेट सुरतमध्ये (Surat) जात उद्धव ठाकरेंविरोधात (Uddhav Thackeray) बंड पुकारलं. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला. तेव्हापासून आजपर्यंत शिंदे आणि ठाकरे (Shinde vs Thackeray) यांच्यातील संघर्ष हा सुरुच आहे. याच सत्तासंघर्षावर आपण टाकूयात एक नजर. (maharashtra political crisis rebellion to shiv senas takeover how is the exact battle of power struggle)

सत्तासंघर्षाची क्रोनोलॉजी समजून घ्या

20 जून 2022:

  • शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह महाराष्ट्र सोडत थेट भाजपशासित गुजरात राज्यातील सुरत गाठलं

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

  • एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. पण त्यावेळी शिवसेनेचे आणखी 10 ते 12 आमदार या बैठकीला गैरहजर होते.

  • 21 जून 2022

    ADVERTISEMENT

    • बंडाच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी युती तोडण्यास सांगितलं. तसेच भाजप युतीचे सरकार स्थापन करण्याची मागणी केली होती.

    ADVERTISEMENT

    22 जून 2022

    • एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 40 आमदारांसह आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार असल्याचे सांगितले.

    • राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेनेसोबतच राहण्याचे आश्वासन दिले.

    Uddhav Thackeray यांना पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही: महाजन

    23 जून 2022

    • शिवसेनेच्या 37 बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. यांनी आपलीच शिवसेना खरी आणि आम्हीच शिवसैनिक असल्याचे सांगितलं.

    24 जून 2022

    • शिवसेनेने एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करण्याची मागणी उपसभापतींकडे केली. दरम्यान, उपसभापतींच्या विरोधात अविश्वास ठरावही आणण्यात आला. जो फेटाळण्यात आला.

    25 जून 2022

    • उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा पाठविल्या. ज्यानंतर या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

    Shiv Sena : ठाकरेंचं कुठं चुकलं, आयोगाने शिंदेंच्या बाजूने का दिला निकाल?

    26 जून 2022

    • सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना, केंद्र, महाराष्ट्र पोलीस आणि उपाध्यक्षांना नोटीस पाठवली होती. बंडखोर आमदारांना न्यायालयांकडून दिलासा मिळाला.

    • एकनाथ शिंदेंनी उपसभापतीविरोधातील अविश्वास ठराव फेटाळण्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

    28 जून 2022

    • भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांकडे विधानसभा बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली.

    29 जून 2022

    • सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती.

    Shiv Sena: शिंदेंच्या व्हिपमुळे ठाकरेंच्या आमदारांचं सदस्यत्व धोक्यात?

    30 जून 2022

    • भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे ठरले.

    • राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे राज्यात युतीचे सरकार स्थापन झालं.

    3 ऑगस्ट 2022

    • शिंदे-फडणवीस यांन सरकार स्थापन केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली. आम्ही 10 दिवस सुनावणी पुढे ढकलली, पण तुम्ही सरकार बनवंल असं शिंदे-फडणवीसांना सुनावलं होतं.

    4 ऑगस्ट 2022

    • जोपर्यंत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश दिला होता. तसेच या प्रकरणाची सुनावणी 8 ऑगस्टला ठेवली. पण 8 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली नाही.

    Maharashtra Political Crisis Live: ठाकरे-शिंदेंची सुप्रीम कोर्टात लढाई सुरू

    23 ऑगस्ट 2022

    • सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले.

    14 फेब्रुवारी 2023

    • घटनापीठाने या दिवसापासून सलग सुनावणी घेत हे प्रकरण सात जणांच्या खंडपीठाकडे द्यायचा की नाही यावर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले.

    17 फेब्रुवारी 2023

    • तीन दिवसांच्या सुनावणीनंतर सात जणांच्या खंडपीठाकडे या प्रकरणाची सुनावणी देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आणि याच प्रकरणी 5 जणांच्या खंडपीठासमोर 21 फेब्रुवारीपासून सलग सुनावणी घेईल असं स्पष्ट केलं.

    • शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT