Mla Disqualification : “आम्ही ठाकरेंना भेटलेलो; ते म्हणाले, पुन्हा भाजपसोबत सरकार”

योगेश पांडे

Mla Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी उदय सामंत यांना कात्रीत पकडले. त्याला उत्तर देताना सामंतांनी ठाकरेंनी दिलेले आश्वासन सांगत मोठा खुलासा केला.

ADVERTISEMENT

shiv sena mlas disqualification case : Shinde mla uday samant cross examined by thackeray faction lawyer.
shiv sena mlas disqualification case : Shinde mla uday samant cross examined by thackeray faction lawyer.
social share
google news

Uday Samant Shiv Sena Mla Disqualification : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांची उलटतपासणी झाली. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणी वेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी उदय सामंत यांना एकनाथ शिंदेंबरोबर जाण्यावरून प्रश्न केले. त्यावर महाविकास आघाडीबद्दल नाराज होतो, असं सामंत म्हणाले. पण, त्या मविआ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होतात, असा प्रश्न विचारल्यानंतर सामंतांनी मोठा गौप्यस्फोट केला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर उदय सामंत यांची उलटतपासणी झाली. यावेळी देवदत्त कामत यांनी काही प्रश्न केले. यात एक मुद्दा होता उदय सामंतांच्या नाराजीचा. महाविकास आघाडीच्या निर्णयाबद्दल नाराज होतो असे सामंत यांनी सांगितले. त्यानंतर देवदत्त कामत यांनी त्यांना कात्रीत पकडलं. त्यावर सामंतांनी पडद्यामागे घडलेला घटनाक्रम सांगितला.

सुनावणीत ठाकरेंच्या वकिलांनी कोणते प्रश्न विचारले आणि सामंत यांनी काय उत्तरं दिली, ते वाचा…

देवदत्त कामत – आपण जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी सुरत आणि गुवाहाटीला जाण्याची जी भूमिका घेतली होती, त्याला आपण पाठिंबा दिला होता का?

उदय सामंत- पाठिंबा नक्कीच दिला होता आणि ती तारीख देखील रेकॉर्डवर आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp