‘बावन’कुळे सोडा लाख कुळे आली तरी…; जितेंद्र आव्हाडांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपच्यावतीनं कालपासून बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना पाडण्यासाठी तयारीला सुरुवात झाली. काल शरद पवारांच्या काटेवाडीतून याचा नारळ फोडला गेला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या काल मॅरेथॉन बैठका पार पडल्या. येत्या २३ सप्टेंबरला केंद्रीय अर्थमंत्री आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या प्रभारी निर्मला सितारामन बारामतीमध्ये येणार आहेत. कालच्या झालेल्या दौऱ्यावरुन आणि भाजपनं केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे.

जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले?

”1990 नंतर शरद पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं. त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत; ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही. आजही काहीजण परत एकदा शरद पवार साहेब आणि बारामती यांच्याबद्दल बोलतायेत. गड उध्वस्त करू म्हणून वल्गना करताहेत विसर्जन करू म्हणता आहेत अर्थात ते केवळ आपण आणि आपला पक्ष चर्चेत रहावा म्हणून…” असं जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

पुढे आव्हाड म्हणतात ”बारामतीचा गड जिंकून दे असं साकडं बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातलं. 60 वर्षे प्रत्येक निवडणूकीचा फॉर्म आदरणीय शरद पवार साहेब ह्याच मारूतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते?. ‘बावन’कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखा वरची धूळ पण उडणार नाही. उद्गारली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आमदार गोपिचंद पडळकर कालच्या भाषणात काय म्हणाले होते?

गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘गणपतीची स्थापना होऊन सातवा दिवस आहे. आज आपण गणपतीचं विसर्जन करणार आहोत. गणपती पुढच्या वर्षी परत येत असतो. २०२४ मध्ये पवारांचं विसर्जन करण्यासाठी राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्याची सुरुवात करायला बारामतीत आले आहेत.’ यावरुनच आव्हाडांनी टोला लगावला आहे.

‘भाजप शिवसेनेला राज्यातील जनतेनं कौल दिला होता. पण एखाद्याचं लुबाडून घ्यायचं. एखाद्याचं हिसकावून घ्यायचं, यात बारामतीकरांना फार आनंद असतो. इथल्या लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे या राज्यात विश्वासघातानं सरकार आलं. त्यानंतर पहिल्या अधिवेशनात सुप्रिया सुळे या वरमाई सारख्या धावपळ करत होत्या. जनतेनं सरकार निवडून दिल्यासारखं स्वागत करत होत्या’, अशी टीका पडळकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT