ईडीचा मोर्चा आमदार रोहित पवारांकडे : ग्रीन एकर कंपनीच्या चौकशीचे आदेश
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा थेट पवार कुटुंबियांकडे वळविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार हे आता ईडीच्या रडारवर आले आहेत. आमदार पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीची प्राथामिक चौकशी करण्याचे आदेश […]
ADVERTISEMENT

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा थेट पवार कुटुंबियांकडे वळविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार हे आता ईडीच्या रडारवर आले आहेत. आमदार पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीची प्राथामिक चौकशी करण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
आमदार रोहित पवार हे ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 2006 ते 2012 दरम्यान संचालक होते. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवारही 2006 ते 2009 दरम्यान कंपनीचे संचालक होते. त्यावेळी कंपनीत येस बॅक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याही सहभाग होता. मात्र, येस बँक घोटाळ्यात नाव आल्यावर त्यांनी या कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता.
पुणे गणेश उत्सवात शिंदे विरूद्ध ठाकरे संघर्षाच्या देखाव्याला पोलिसांचा विरोध, संमती नाकारल्याने वाद
याशिवाय या कंपनीत संचालक असणारे इतर सदस्य हे सध्या वाधवान यांच्यासोबत इतर कंपन्यांमध्ये पार्टनर आहेत. यामध्ये बाबासाहेब सुर्यवंशी, लखमिंदर सिंग, धोंडू जडयार अरविंद पाटील यांच्या नावांचा सामावेश आहे. ज्यावेळी रोहित पवार ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून बाहेर पडले त्यावेळी हळूहळू इतर 4 सदस्य देखील त्या कंपनीतून बाहेर पडले.