मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राष्ट्रवादीचा इशारा! "२४ तासात अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा नाहीतर..."

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत अपशब्द वापरत केली टीका
Ncp Spoke Person Mahesh Tapase Wrote Letter To Cm Eknath Shinde Abdul Sattar Dismiss Supriya Sule
Ncp Spoke Person Mahesh Tapase Wrote Letter To Cm Eknath Shinde Abdul Sattar Dismiss Supriya Sule

महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर देत असताना सत्तारांची जीभ घसरली. त्यांनी गलिच्छ भाषेत टीका करत असताना सत्तारांच्या टीकेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होतो आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आता अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी काय म्हटलं आहे?

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची २४ तासात मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, नाहीतर सरकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरं जावं लागेल. महेश तपासे यांनी याबाबत एक पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे. त्यातच हा इशारा देण्यात आला आहे. तपासे यांनी असंही म्हटलं आहे की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा एक धागा अनेक वर्षांपासून जपला गेला आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाने राजकारणाच्या पलिकडे जाऊन सौहार्दाचं वातावरण जपलं आहे. असं असताना मंत्रिमंडळातले मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेलं वक्तव्य अत्यंत अशोभनीय आणि असंस्कृत आहे मी या वक्तव्याचा निषेध करतो.

खासदार सुप्रिया सुळे यांचा अपमान हा महाराष्ट्रातील महिलांचा अपमान

खासदार सुप्रिया सुळे यांचा अपमान हा महाराष्ट्रातील महिलांचा अपमान आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरं जावं लागेल असाही इशारा महेश तपासे यांनी दिला आहे.

अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेंबद्दल काय म्हणाले?

'सुप्रिया सुळे म्हणताहेत की, ५० खोके तुम्हालाही मिळालेत का? त्यावर तुम्ही (अब्दुल सत्तार) त्यांना म्हणता का तुम्हाला द्यायचेत का? तर त्यावर त्या (सुप्रिया सुळे) म्हणताहेत की, तुमच्याकडे आले असतील म्हणूनच तुम्ही त्यांना ऑफर करताहेत... काय सांगाल?', असा प्रश्न 'लोकशाही' वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने अब्दुल सत्तार यांना विचारला. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, 'इतकी भिकार#$ झाली असेल, सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ', असं उत्तर सत्तारांनी दिलं.

'वापरलेले शब्द २४ तासांत परत घ्या, नाहीतर...', अमोल मिटकरींनी दिला इशारा

सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल आमदार अमोल मिटकरींनी टीका करत इशारा दिलाय. 'अब्दुल सत्तार आम्ही तुम्हाला मोठे अलंकार देऊन बोलु शकतो. मात्र आमच्या पक्षाची ती संस्कृती नाही. सुप्रिया सुळेंबद्दल वापरलेले अपःशब्द 24 तासांच्या आत दिलगिरी व्यक्त करून परत घ्या, नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल', असं अमोल मिटकरींनी ट्विट करून म्हटलंय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in