‘वाचाळवीरांना…’, बोलले पडळकर, पण रोहित पवार संतापले देवेंद्र फडणवीसांवर
Rohit Pawar Devendra Fadnavis : गोपीचंद पडळकर नेहमीच शरद पवार आणि पवार कुटुंबियांबद्दल बोलत असतात. टीका करतात. पण, यावेळी भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवारांनाच गोपीचंद पडळकरांनी लक्ष्य केलं. अजित पवारांना लबाड लांडग्याचं पिल्लू म्हणाले. यावरच रोहित पवारांनी आक्षेप घेतला आणि थेट फडणवीसांना सवाल केला. गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले? “अजित पवारांची धनगर समाजाबद्दल भावना […]
ADVERTISEMENT

Rohit Pawar Devendra Fadnavis : गोपीचंद पडळकर नेहमीच शरद पवार आणि पवार कुटुंबियांबद्दल बोलत असतात. टीका करतात. पण, यावेळी भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवारांनाच गोपीचंद पडळकरांनी लक्ष्य केलं. अजित पवारांना लबाड लांडग्याचं पिल्लू म्हणाले. यावरच रोहित पवारांनी आक्षेप घेतला आणि थेट फडणवीसांना सवाल केला.
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?
“अजित पवारांची धनगर समाजाबद्दल भावना स्वच्छ नाही. त्यामुळेच त्यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. पत्र दिलं नाही आणि यापुढेही देण्याची गरज वाटत नाही. अजित पवारांना आम्ही उपमुख्यमंत्री मानत नाही. ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र दिलं”, असं पडळकर अजित पवारांबद्दल बोलले.
हेही वाचा >> Shiv Sena MLAs : ‘ते काम आमचं की विधानसभा अध्यक्षांचं?’ ठाकरेंचा कोर्टात खडा सवाल
पडळकरांनी अजित पवारांबरोबर सुप्रिया सुळेंवरही टीका केली. ते म्हणाले होते की, “ही लबाड लांडग्याची लेक आहे. धनगर समाजाने तुमच्या पालख्या वाहिल्या. लोकांच्या चपला फाटल्या तरी तुमच्या वडिलांनी, भावाने, पुतण्याने किंवा तुम्ही धनगर समाजाकडे पाहिलं नाही. त्यामुळे धनगर समाजाबद्दल जास्त पुळका आणण्याची गरज नाही”, असं ते म्हणाले.
रोहित पवार काय बोलले?
पडळकरांच्या या विधानानंतर रोहित पवार म्हणाले, “राष्ट्रीय राजकारणातील आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, उपमुख्यमंत्री अजितदादा या नेत्यांवर बोलताना काही लोकप्रतिनिधी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जाणीवपूर्वक पातळी सोडून बोलतात.”