BJP : ‘आता गप्प का?’, शरद पवारांमुळे राहुल गांधी खिंडीत, नेमकं काय घडलं?

भागवत हिरेकर

Sharad Pawar met Gautam Adani, BJP attacked On Rahul Gandhi : राहुल गांधी सातत्याने गौतम अदाणींवरून मोदी सरकारला लक्ष्य करत आहेत. आता शरद पवारांनी अदाणींची भेट घेतल्यानंतर भाजप नेत्यांनी राहुल गांधींना कोंडीत पकडलं आहे.

ADVERTISEMENT

NCP Chief Sharad Pawar is once again seen with industrialist Gautam Adani. BJP's national spokesperson Shehzad Poonawala targeted Rahul Gandhi.
NCP Chief Sharad Pawar is once again seen with industrialist Gautam Adani. BJP's national spokesperson Shehzad Poonawala targeted Rahul Gandhi.
social share
google news

Sharad Pawar Gautam Adani Meeting : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदाणी यांच्यासोबत दिसले. एका कार्यक्रमात शरद पवार रिबन कापत आहेत. त्यांच्या बाजूला गौतम अदाणी हे उभे आहेत. हे छायाचित्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, राजकीय वर्तुळात या भेटीबद्दल असंख्य प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दुसरीकडे पवार अदाणी भेटीवरून भाजपने इंडिया आघाडी आणि राहुल गांधींना खिंडीत गाठलं आहे. भाजपचे नेते हिमंत बिस्वा सरमा यांनी थेट राहुल गांधींनाच सवाल केला आहे.

सीएम हिमंता बिस्वा शर्मा आणि अमित मालवीय यांनी केला सवाल

या फोटोबद्दल अमित मालवीय यांनी X वर लिहिले की, ‘राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यातील मतभेद यापेक्षा अधिक स्पष्ट होऊ शकत नाहीत. इंडिया आघाडी अनेक आघाड्यांवर तुटत आहे.’ त्याचवेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या फोटोवरून प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, ‘शरद पवार अदाणींना वारंवार भेटतात तेव्हा राहुल गांधी गप्प का असतात? एका कार्यक्रमात शरद पवार अदाणींसोबत दिसले, तेव्हा राहुल गांधी आणि काँग्रेस गप्प का? हे सोयीचे राजकारण आहे, ब्लॅकमेलिंग आहे’, असं म्हणत सरमा यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे.

राहुल गांधी अदाणींबद्दल विचारताहेत प्रश्न

राहुल गांधी यांनी अनेकवेळा अदाणी आणि पीएम मोदी यांच्यातील संबंधांवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेषत: हिंडेनबर्ग अहवाल समोर आल्यानंतर त्यांनी या मुद्द्यावरून भाजप आणि केंद्र सरकारवर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु शरद पवार हे सातत्याने वेगळी भूमिका घेताना दिसले. शरद पवार उद्योगपती गौतम अदाणी यांच्यासोबत दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी खुद्द अदाणी यांनीही शरद पवार यांची त्यांच्या घरी सिल्व्हर ओक वर जाऊन भेट घेतली होती.

शरद पवार-अदाणी यांची अहमदाबादमध्ये झाली भेट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांची शनिवारी 23 सप्टेंबर रोजी अहमदाबादमध्ये भेट झाली. निमित्त होते, भारतातील पहिल्या लॅक्टोफेरिन प्लांटच्या उद्घाटनाचे. त्यानंतर शरद पवार यांनी गौतम अदाणी यांच्या घरी आणि कार्यालयालाही भेट दिली. शरद पवार यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, ‘गौतम अदाणी यांच्यासमवेत वसना, चाचरवाडी, गुजरात येथे भारतातील पहिल्या लॅक्टोफेरिन प्लांट एक्झिमपॉवरचे उद्घाटन करणे हा सुदैवाची गोष्ट आहे.’

हे वाचलं का?

    follow whatsapp