Sharad Pawar: ‘जे महिलेनं सुनावलं ते…’, पवारांनी कोल्हापुरात जाऊन मुश्रीफांना डिवचलं!
Sharad Pawar Criticized to Hasan Mushrif: कोल्हापूरच्या सभेत शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. त्यांनी ईडीच्या नोटीसला घाबरून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं शरद पवार यावेळ म्हणाले.
ADVERTISEMENT

Sharad Pawar Criticized to Hasan Mushrif: कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (25 ऑगस्ट) कोल्हापूरमध्ये जाहीर सभा घेत मोदी सरकारवर तुफान टीका केली. मात्र, याचवेळी अजित पवार गटात गेलेल्या मंत्री हसन मुश्रीफांवर (Hasan Mushrif) अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली. त्यांच्या घरातील महिलेने जे ईडीच्या अधिकांऱ्यांना सुनावलं तसंही त्यांना बोलता आलं नाही.. अन् ते भाजपसोबत गेले. अशी टीका शरद पवार यांनी यावेळी केली आहे. (sharad pawar criticized to hasan mushrif in kolhapur over he join with bjp government maharashtra politics latest)
शरद पवारांनी कोल्हापुरात घेतला हसन मुश्रीफांचा खरपूस समाचार…
‘आज ही जी सत्ता आहे त्या सत्तेचा वापर हा विरोधी पक्षाच्या लोकांना त्रास कसा द्यायचा यासाठी वापरली जात आहे. अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. जे स्वच्छ भूमिका घेत होते. त्यांना आवार घालायचं म्हणून त्यांच्यावर खोटा खटला भरला. बारा-तेरा महिने राज्याचा गृहमंत्री तुरुंगात राहतो.. पण हा गृहमंत्री स्वाभिमानी माणूस होता. त्यांना सांगण्यात आलं की, तुमच्याकडे या, तुम्ही आमच्या गटात या.. तुम्ही आमच्या पक्षात या.. जर आला नाहीत तर तुमची जागा आत आहे..’
‘त्यांनी स्वच्छ सांगितलं.. माझी जागा तुरुंगात असो नाही तर आणखी कुठे असो.. मी सत्य हे सत्य म्हणणार.. मी तुमच्याशी तडजोड करणार नाही. ही गोष्ट सामनाचा संपादक राऊत.. ते लिहितात, टीका करतात.. त्यांनाही तुरुंगात टाकलं. त्यांना एकच सांगितलं तुम्ही हे बंद करा.. त्यांनी सांगितलं.. सत्य लिहिण्याचा अधिकार माझा आहे. तो मी बंद करणार नाही. त्यांनाही तुरुंगात टाकलं. नवाब मलिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, प्रवक्ते ते सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या गोष्टीवर सातत्याने टीका-टिप्पणी करत होते. त्यांनाही तुरुंगात टाकलं. आता दोन महिन्यांसाठी त्यांना जामीन मिळाला आहे.’
‘अशा प्रकारच्या गोष्टी या प्रामाणिकपणाने समाजकारण करणाऱ्या लोकांच्या बाबतीत केल्या जात आहेत. त्याचा परिणाम त्यांना असं वाटलं.. की, आम्ही घाबरून जाऊ.’