India Alliance Meeting : ‘हे’ 10 राजकीय पक्ष विरोधकांच्या वाटेतील काटे!
India Alliance latest updates : भारत राष्ट्र समिती, बीजेडी, तेलगू देसम यासह इतर काही पक्ष इंडिया आघाडीला नुकसान पोहोचवू शकतात.
ADVERTISEMENT

India Alliance Meeting Mumbai : 2024 मध्ये भाजप विरोधात लढण्यासाठी विरोधी बाकांवरील 28 पक्षाच्या आघाडीची बैठक मुंबईत होत आहे. विरोधी इंडिया आघाडीची म्हणजेच ‘भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी’ची तिसरी बैठक होत आहे.
‘भारत’ आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे जूनमध्ये झाली होती. दुसरी बैठक जुलैमध्ये बंगळुरू येथे झाली होती. याच बैठकीत आघाडीचे नाव ‘इंडिया’ ठेवण्यात आले. आता मुंबईत होणाऱ्या बैठकीत आघाडीच्या भावी रणनीतीवर चर्चा होणार आहे. या बैठकीत दोन मोठे प्रश्न सोडवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आधी विरोधी पक्ष जागावाटपाबाबत चर्चा करू शकतात आणि हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. आणि दुसरे म्हणजे संयुक्त विरोधी पक्षाचा पंतप्रधानपदाचा चेहरा.
हेही वाचा >> India Alliance : …म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी वंचित आघाडीला सोबत घेत नाहीये
या बैठकीला 28 पक्षांचे 63 नेते आणि 6 मुख्यमंत्री उपस्थित आहेत. विरोधी आघाडी एकजुट होऊन भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला पराभूत करण्याचा दावा करत आहे. पण असे काही पक्ष आहेत जे त्याचा खेळ खराब करू शकतात.
हे असे पक्ष आहेत जे विरोधी पक्षांच्या महाआघाडीचा भाग नाहीत. ते एनडीएसोबतही नाहीत. तरीही यातील काही पक्ष एनडीएसोबत जाऊ शकतात, असे मानले जात आहे.










