‘…तर सरकार पडू शकते’, 16 आमदारांच्या अपात्रतेवर जयंत पाटील यांचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

16 mlas disqualified ncp jayant patil big statement
16 mlas disqualified ncp jayant patil big statement
social share
google news

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने निर्णय़ दिल्यानंतर राज्यात शिंदे सरकार कायम राहणार आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्याकडे सोपवला होता. आता राहुल नार्वेकर यावर कधी निर्णय़ देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. मुख्यमंत्री शिंदे जर अपात्र ठरले, तर हे सरकार जाणार,कारण जेव्हा मुख्यमंत्री जातो तेव्हा हे सरकारही जाते,असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. (16 mlas disqualified ncp jayant patil big statement the goverment will be collapsed)

ADVERTISEMENT

16 आमदारांमध्ये एक मुख्यमंत्री देखील आहेत. मुख्यमंत्रीच जर अपात्र ठरले तर हे सरकार जाणार,कारण जेव्हा मुख्यमंत्री ही जातो तेव्हा हे सरकारही जाते. त्यामुळे जर 16 आमदार अपात्र ठरले की बाकी शिवसेनेचे आमदारांचे विचारही बदलू शकतात. कदाचित ते उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचाही विचार करू शकतात. त्यामुळे सरकार पडूही शकते, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा : राहुल नार्वेकर म्हणाले, शिवसेनेच्या 16 नाही तर 54 आमदारांवर घेणार निर्णय

तसेच मुख्यमंत्री अपात्र ठरले आणि त्यांचा राजीनामा आला तर नव्या सरकारच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु होते.आणि विधानसभेत ज्या पक्षाचे सर्वांत जास्त सदस्य असतात, त्यांना राज्यपाल सत्ता स्थापनेचे आमंत्रण देऊ शकतात. त्यांनी बहूमत सिद्ध केलं तर सत्ता स्थापन होईल आणि जर सत्तास्थापन झाली नाही तर सत्ता बदल होऊ शकतो, असे सुचक विधान देखील जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

अजित पवार काय म्हणाले?

शिवसेनेच्या 16 आमदारांचा वेगळा निकाल लागणारच नाही. आणि जर वेगळा निकाल लागला तरी देखील बहुमतावर कुठलाही परिणाम होत नाही. 288 मधून 16 गेले तरी त्यांच्याकडे 272 आमदार राहतात. त्यामुळे बहुमत आहे. फार काही परिणाम होणार नाही, असे मला वाटतेय, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

ठाकरे गटाचे उपाध्यक्षांना निवेदन

शिवसेना ठाकरे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा आशयाचे निवेदन सर्वोच्च न्यायालयाची प्रत जोडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना विधानभवनात जाऊन दिल्याची माहिती ठाकरे गटाच्या आमदारांनी दिली. विधानसभा अध्यक्ष अनुपस्थितीत असल्याने उपाध्यक्षांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) विधान भवनात आल्यानंतर लवकरच त्यांना सुद्धा पुन्हा एकदा विधानभवनात येऊन आमदारांच्या अपात्रते संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली जाईल,असं सुद्धा ठाकरे गटाच्या आमदारांकडून सांगण्यात आले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र होणार?, फडणवीसांचं मोठं विधान

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT