Devendra Fadnavis : 'तुम्ही लाचार म्हणूनच अजित पवारांसोबत...', काँग्रेस-भाजपमध्ये संघर्षाचा भडका
Nana Patole Criticize Devendra Fadnavis, Congress Vs Bjp : फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे, माणूस आणि कुत्र्यातला फरक जर राज्याच्या गृहमंत्र्यांना कळत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

फडणवीसांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे

नाना पटोलेंनी स्वतःची कारकीर्द तपासावी

भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला
Nana Patole Criticize Devendra Fadnavis, Congress Vs Bjp : फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे, माणूस आणि कुत्र्यातला फरक जर राज्याच्या गृहमंत्र्यांना कळत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली होती. या मागणीनंतर भाजपने देवेंद्रजींवर (Devendra Fadnavis) टीका करण्यापूर्वी स्वतःची कारकीर्द तपासावी. अशी टीका पटोलेंवर केली होती. या टीकेवर आता काँग्रेसने पलटवार करत देवेंद्र फडणवीसांना डिवचलं आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पेटलाय. (abhishek ghosalkar murder nana patole criticize bjp devendra fadnavis congress vs bjp maharashtra politics)
नाना पटोलेंनीं देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर भापजने नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्र भाजपचे ट्विट जशाच तसं
नाना पटोले तुम्हाला देवेंद्र फडणवीसजींवर टीका करण्याचा अधिकार नाही, कारण तुमचं मविआ सरकार असताना त्यावेळचे गृहमंत्री काय करत होते? त्यांना तुरुंगात जावं लागलं, 100 कोटी वसुली, ॲंटलिया बाँब प्लॅंट प्रकरण, वाझे की लादेन, मनसुख हिरेन प्रकरण महाराष्ट्रातील जनता अजूनही विसरलेली नाही.