Jay Pawar: ‘दादांशी बोलून घ्या, मला सिग्नल दिला की मी लगेच..’ अजित पवारांच्या धाकट्या मुलाचं मोठं विधान
Ajit Pawar Son Jay Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभेनंतर अन दोन दिवसातच राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाला भेट देत जय पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. पाहा जय पवार नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT
Jay Pawar Politics: वसंत मोरे, बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे दोन्ही पुत्र सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात बारामतीच्या राजकारणात तरुणांची फळी पाहायला मिळणार आहे. दरम्यान, अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) यांनी आज (29 ऑगस्ट) अचानक बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला भेट देत एक मोठं विधान केलं आहे. (ajit pawar gave a signal that I will enter politics immediately jay pawars big statement)
ADVERTISEMENT
‘तुम्ही दादांशी बोलून घ्या त्यांनी मला सिग्नल दिला की मी लगेच राजकारणात यायला तयार आहे.’ असं विधान जय पवार यांनी यावेळी केलं आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्यापाठोपाठ जय पवार हे देखील राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भाजपसोबत सत्तेत सामील होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतली. ज्यानंतर बारामतीत आयोजित केलेल्या स्वागत यात्रेत अजित पवारांचे मोठे पुत्र पार्थ पवार सहभागी झाले होते. त्यानंतर आज अजित पवारांचे दुसरे पुत्र जय पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> LPG Price Cut: घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट, पण…
जय पवार नेमकं काय म्हणाले?
बारामतीत शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शारदा प्रांगण येथे सभा झाली. पण दोन दिवसातच अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाला भेट दिली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी जय पवार यांचे औक्षण करत शहर कार्यालयात त्यांचे स्वागत केले.
हे ही वाचा >> Manatralaya: सरकारला हादरा, मंत्रालयात तुफान राडा; सुरक्षा जाळ्यांवर शेकडो जणांच्या उड्या
यावेळी मी तुमच्या सगळ्यांचे कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे असे जय पवार म्हणाले. लवकरच राजकारणात सक्रिय व्हावे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. तुम्ही दादांशी बोलून घ्या त्यांनी मला सिग्नल दिला की मी लगेच तयार आहे. असे देखील जय पवार म्हणाले.. यामुळे जय पवार हे राजकारणात सक्रिय होणार हे मात्र नक्की झाले आहे..
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT