Ajit Pawar : ''कुटुंबीयांना खूप त्रास...'', सुप्रिया-सुनेत्रा पवारांवर बोलताना अजितदादा झाले हळवे
Ajit Pawar Interview : अजित पवार यांनी एएनआयला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. या मुलाखतीत त्यांनी बारामती विधानसभेच्या निकालावर देखील भाष्य केलं. बारामतीचा निकाल लागल्यानंतर मी विचार करायचो, हे काय झालं? कसं झालं? कुटुंबासाठी हे चुकीचं झालं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कुटुंबासाठी हे चुकीचं झालं
कुटुंबाला खूप मोठा त्रास झाला
मला असं करायला नको होत
Ajit Pawar Interview : बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरूद्ध पवार लढत झाली होती. या लढतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) या विजयी ठरल्या होत्या तर सुनेत्रा पवारांचा (Sunetra Pawar) पराभव झाला होता. या निकालावर आता अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कुटुंबासाठी हे चुकीचं झालं. कुटुंबाला खूप मोठा त्रास झाला. मी यात कुणालाच दोष देणार नाही. मला असं करायला नको होतं,असे अजित पवारांनी सांगितले आहे. (ajit pawar interview reaction on baramati lok sabha result sunetra pawar supriya sule maharashtra politics)
अजित पवार यांनी एएनआयला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. या मुलाखतीत त्यांनी बारामती विधानसभेच्या निकालावर देखील भाष्य केलं. बारामतीचा निकाल लागल्यानंतर मी विचार करायचो, हे काय झालं? कसं झालं? कुटुंबासाठी हे चुकीचं झालं. कारण खूप वर्षापासून आम्ही कुटुंब म्हणून एकत्र राहत होतो. याला संपूर्ण जबाबदार मी आहे. मी यात कुणालाच दोष देणार नाही. मला असं करायला नको होतं, अशी कबुली अजित पवारांनी दिली.
हे ही वाचा : Ajit Pawar: अजितदादांचा 'हा' कोणता डाव?, बारामतीची जागा सेफ करण्यासाठी नवी खेळी?
कुटुंबा कुटंबात जेव्हा दोन्ही उमेदवार एकमेंकांविरूद्ध उभे राहिले आणि उभं राहिल्यानंतर एक जण हरणार होता, एकाचा पराभव होणार होता, जिंकणारा हा कुटुंबाचाच होता आणि हरणारा ही कुटुंबाचाच होता, कुटुंबियांना याचा खूप त्रास झाला, असे देखील अजित पवारांनी यावेळी मान्य केले.
सुनेत्रा यांच्या उमेदवारीचा निर्णय कुणाचा होता?
अजित पवारांनी यावेळी सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय कुणाचा होता. याची देखील माहिती दिली आहे. सुनेत्रा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पार्लमेंट्री बोर्डाचा होता. दुसरं कुणीही मला सांगितलं नव्हत, असे देखील अजित पवारांनी स्पष्ट केले.










