“मुख्यमंत्रीपदावर आताच दावा करू शकतो”, बंडाच्या चर्चानंतर अजित पवारांचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

NCP Leader Ajit Pawar Speaks on NCP and Chief minister post clam in 2024
NCP Leader Ajit Pawar Speaks on NCP and Chief minister post clam in 2024
social share
google news

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस 2024 मध्ये कशाला आताच मुख्यमंत्री पदावर दावा करु शकते, असं मोठं विधान विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. ते पुण्यात सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) 2024 मध्ये मुख्यमंत्रीपदावर दावा करणार का? या प्रश्नावर पवार यांनी उत्तर दिलं. यामुळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस, मुख्यमंत्रीपद आणि अजित पवार यांच्याभोवती चर्चा सुरु झाल्या आहेत. (NCP Leader Ajit Pawar Speaks on NCP and Chief minister post clam in 2024)

ADVERTISEMENT

1999 पासून राष्ट्रवादीने सहा उपमुख्यमंत्री दिले. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदाचे आकर्षण का आहे? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती. काँग्रेसपेक्षा आमच्या जागा 2 अधिक होत्या. त्यावेळी आम्हाला संधी होती. मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार असल्याची काँग्रेसच्या नेत्यांचीही मानसिकता होती. तेव्हा आम्ही आर.आर. पाटलांना विधीमंडळ नेता म्हणून निवडले होते. त्यामुळे सहाजिकच मुख्यमंत्री आर.आर. पाटील झाले असते.

राष्ट्रवादीच्या बैठकीचे अजित पवारांनाच नाही निमंत्रण? नेमकं कारण काय?

पण त्यावेळी दिल्लीत नेमकं काय घडलं? याबाबत मला माहित नाही. मात्र पक्षाच्या शिस्तेसाठी वरिष्ठांचा आदेश पाळावा लागला आणि आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतरच्या काळात आम्ही कायमचं दोन नंबरच्या स्थानावर राहिलो. काँग्रेसच्या जास्त जागा आल्या आणि मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे राहिलं आणि उपमुख्यमंत्रीपद आमच्याकडे राहिले, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

अजित पवारांचं राज्यपालांना पत्र, केली मोठी मागणी…

मुख्यमंत्रीपदावर आताही दावा ठेवायची तयारी आहे :

यापुढे आता 2024 राष्ट्रवादी हा मुख्यमंत्रीपदावर दावा करणार का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, 2024 कशाला, आता म्हटलं तरी ठेवायची तयारी आहे. अजित पवार यांच्या या सुचक विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. दरम्यान, मागील काही दिवसांपासून अजित पवार यांची भाजपशी जवळीक वाढतं असून ते भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधाणं आलं आहे. या चर्चांना अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या आजच्या विधानानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी, मुख्यमंत्रीपद आणि अजित पवार यांच्याभोवती चर्चा सुरु झाल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT