Narayan Rane: ‘अजित पवार पुण्याला येऊन बारा वाजवीन मी’, ‘त्या’ विधानावरुन राणे संतापले

मुंबई तक

Narayan Rane expressed anger on Ajit Pawar Statement: मुंबई: ‘अजित पवार माझ्या फंदात पडू नका नाहीतर पुण्याला येऊन बारा वाजवीन मी. पुण्याला येऊन..’ असा इशाराच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना दिला आहे. ‘राणेंना एका बाईने पाडलं.. एका बाइने’ या अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन नारायण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

Narayan Rane expressed anger on Ajit Pawar Statement: मुंबई: ‘अजित पवार माझ्या फंदात पडू नका नाहीतर पुण्याला येऊन बारा वाजवीन मी. पुण्याला येऊन..’ असा इशाराच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना दिला आहे. ‘राणेंना एका बाईने पाडलं.. एका बाइने’ या अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन नारायण राणे चांगलेच संतापलेले दिसून आले. पत्रकारांशी बोलताना राणेंनी आपला हा संताप व्यक्त केला. (ajit pawar statement on narayan rane bandra defeat rane got angry over)

पाहा नारायण राणे नेमकं काय म्हणाले:

‘अजितदादाला बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं मला माहित नाही. खरं तर मला त्याबद्दल बोलायचंच नाही. तो ज्या प्रकारचा राजकारणी आहे ना.. त्याबद्दल बोलू नये. बारामतीच्या बाहेर त्याने दुसऱ्यांचे बारसे करायला जाऊ पण नये. माझ्या फंदात पडू नका नाहीतर पुण्याला येऊन बारा वाजवीन मी. पुण्याला येऊन.. माझं कार्यक्षेत्र पहिलं मुंबई.. बाळासाहेबांनी मला कोकणात पाठवलं. तिकडून सलग सहा वेळा निवडून आलो आहे. त्यानंतर मला सांगितलं पक्षाने, सोनिया गांधींनी की, तुम्ही वांद्रेतून उभे राहा. त्यांच्या म्हणण्यानुसार उभा राहिलो. माझ्या मतदारसंघात नाही उभा राहिलो.’

‘नारायण राणेंना तर बाईने पाडलं.. बाईने..’, अजित पवारांची बोचरी टीका

‘महिला असो वा पुरूष असो… उमेदवार हा उमेदवार असतो. महिला आणि पुरुषात काय आहे. आता ती आहे का त्यांच्याकडे? आता कोणाकडे आहे म्हणावं?’

‘आता ठाकरे गट सगळं मी केलं.. मी केलं असं म्हणतील. आता केंद्राने सही होऊन नोटीफिकेशन कधी निघालं? ते कोणाच्या राजवटीत घडलं.. ते महत्त्वाचं आहे. उगाच मी केलं.. मी केलं. एक तर मराठी भाषेतील विशेषणं देखील योग्य जागी वापरता येत नाही..’ असं म्हणत राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.