Aditya Thackeray : जपान दौऱ्यांवरून फडणवीसांना लक्ष्य, ‘आदू बाळा’… म्हणत शेलारांची बोचरी टीका
भाजपकडून आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी तर ‘आदू बाळा’ असा आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत बोचरी टीका केली आहे.
ADVERTISEMENT
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज सत्ताधाऱ्यांना विदेश दौऱ्यावरून लक्ष्य केले होते. देवेंद्र फडणवीसांचा जपान दौरा, एकनाथ शिंदेंचा जर्मनी लंडन दौरा…असे सर्व सत्ताधारी नेत्यांचे दौरे काढत, जनतेच्या पैशावर मंत्री परदेशात सहल करत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. या टीकेवर आता भाजपकडून आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी तर ‘आदू बाळा’ असा आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत बोचरी टीका केली आहे. (ashish shelar bjp reply aditya thackeray ask qustion on devendra fadnavis japan tour)
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे यांनी एक्स या सोशल प्लॅटफॉर्मवर देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्याचा खर्च एमआयडीसीने केल्याचा दावा केला होता. आदित्य ठाकरे यांचा हा दावा आशिष शेलारांनी खोडून काढत जपान दौऱ्याचा संपूर्ण खर्च जपान सरकारने केल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीसांना शासकीय अतिथी म्हणून निमंत्रण येते, तेव्हा त्यांचा खर्च हा जपान सरकारने केला आहे. तर राज्य सरकारने केवळ त्यांच्या सोबत जाणार्या अधिकार्यांचा खर्च केल्याचे आशिष शेलार यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच जपान दौर्यात देवेंद्र फडणवीस यांनी काय केले आणि किती गुंतवणूक आणली आहे,याची संपूर्ण माहिती त्यांच्या सोशल मीडियावर उपलब्ध आहे. त्यामुळे ती वाचली नसेल तर पुन्हा एकदा वाचून घ्यावी, असा सल्ला शेलारांनी आदित्य ठाकरेंना दिला.
हे ही वाचा : Eid-e-Milad: ईद-मिलादच्या मिरवणुकीत हवेत भिरवकला झेंडा अन् तरुणाने जागीच गमवला जीव!
आदू बाळा,@AUThackeray
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला, कारण, मुळातच त्यांना निमंत्रण हे शासकीय अतिथी म्हणून जपान सरकारने दिले होते. अतिथी म्हणून निमंत्रण येते, तेव्हा त्यांचा खर्च हा जपान सरकार करीत असते. महाराष्ट्र… pic.twitter.com/b4Gz7BWvSn
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 30, 2023
हे वाचलं का?
बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्याने दुसर्यांना शहाणपण शिकवायचे नसते, अशी बोचरी टीका देखील आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंवर केली. यासोबत बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे. पण, त्याचा कळस गाठू नका !असे देखील शेलार म्हणाले. शाळेतील बडबडगीते म्हणण्याची जेव्हा बालबुद्धी आणि वय असते, त्या वयात सरकारला प्रश्न केले, की त्यानंतर जे होते, ते आदित्य ठाकरेंसोबत झाल्याचा टोला देखील आशिष शेलारांनी लगावला.
शाळेतील बडबडगीते म्हणण्याची जेव्हा बालबुद्धी आणि वय असते, त्या वयात सरकारला प्रश्न केले, की त्यानंतर जे होते, ते @AUThackeray यांचे झाले आहे.@ShivSenaUBT_@BJP4Mumbai @BJP4Maharashtra#BJP #Japan #Maharashtra #DevendraFadnavis pic.twitter.com/sU1raNyLNs
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 30, 2023
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Video : खऱ्याखुऱ्या बंदुकीशी खेळ अन् अचानक सुटली गोळी, चिमुकलीचा…
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रद्द झालेला जर्मनी लंडन दौरा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा रद्द झालेला घाना दौरा यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचा प्रस्तावित विदेश दौरा यावर आदित्य ठाकरेंनी सवाल उपस्थित केले आहेत. देवेंद्र फडणवीसांचा जपान दौरा हा जपानच्या सरकारच्या निमंत्रणावरून असला तरी त्याचा खर्च एमआयडीसीकडून करण्यात आला आहे. खरं तर ज्यांनी निमंत्रण दिले होते, त्यांनी खर्च करायला हवा होता, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते.
ADVERTISEMENT
Sharing the GR shared by Govt itself where point 6 mentions “the entire expenditure on travel and accommodation for the delegation to be borne by @midc_india, Mumbai”.
Unless this line is a coded message, in simple english the govt has accepted that DCM’s Japan tour expense was… https://t.co/hvW9lwHhf9 pic.twitter.com/7Srmj9XLXB
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 30, 2023
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT