BJP : कल्याणनंतर रायगडमध्ये महायुतीत वितुष्ट! भाजपनेच काढली तटकरेंची घराणेशाही

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

'सगळीचं पद तुमच्या घरात कशाला हवीत' अशी टीका भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सुनील तटकरे यांच्यावर केली आहे.
atul kalsekar criticize sunil tatkare raigad lok sabha election 2024 bjp ajit pawar group
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तटकरे साहेब मतदार संघात अडकून पडलेत

point

तुम्ही या मतदार संघातून बाहेर पडा

point

अतुल काळसेकरांची सुनील तटकरेंवर टीका

Atul Kalsekar Criticized Sunil Tatkare :  राज्यात महायुतीचं तीन चाकांचं सरकार असलं तर तीनही पक्षात समन्वय दिसून येत नाही. ही गोष्ट मराठा आंदोलनावरून अधोरेखीत झाली आहे. त्यात भाजप नेहमीच घराणेशाहीवरून विरोधकांवर हल्ला चढवते. त्याच भाजपने आता घराणेशाहीवरून अजित पवार गटाच्या नेत्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. 'सगळीचं पद तुमच्या घरात कशाला हवीत' अशी टीका भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर (Atul kalsekar)  यांनी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर केली आहे. (atul kalsekar criticize sunil tatkare raigad lok sabha election 2024 bjp ajit pawar group)

ADVERTISEMENT

अतुल काळसेकर हे पेणमधील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना अतुल काळसेकर यांनी सुनील तटकरेंवर जोरदार हल्ला चढवला होता. 'महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक मतदारसंघात जाऊन महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पण दुदैवाने तटकरे साहेब या मतदार संघात अडकून पडले आहेत. पण माझी त्यांना सूचना आणि विनंती आहे', 'तटकरे साहेब तुम्ही या मतदार संघात अडकून पडू नका. तुम्ही या मतदार संघातून बाहेर पडा', असा सल्ला अतुल काळसेकर यांनी सुनील तटकरे यांना दिला आहे. 

अतुश काळसेकर पुढे म्हणाले की, तुमचा पुतण्या धैर्यशील पाटील हा मतदार संघ सांभाळण्यासाठी समर्थ आहे. त्यामुळे  सगळीच मते तुम्हाला तुमच्या घरात कशाला हवी आहेत, अशी टीका त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर केली आहे. 

हे वाचलं का?

दरम्यान रायगड लोकसभेचे उमदेवार भाजपचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार धैर्यशील पाटील असणार असल्याची कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. भाजप हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे रायगड लोकसभेची जागा भाजपलाच मिळावी,असा दावा भाजप जिल्हा पातळीवरून नेत्यांकडून करण्यात आला आहे. विद्यमान आमदार सुनील तटकरे यांना निवडून आणणारे 6 आमदार त्यांच्यासोबत नाही आहे. त्यामुळे मागच्या निवडणुकीतील विजयाचा निकाल सांगता येणार नाही, असे देखील स्थानिक भाजपचे म्हणणे आहे.  

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT