दारू आणि मांस… भाजप आमदार राम कदमांची मोठी मागणी, एकनाथ शिंदे काय करणार?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ayodhya ram mandir pran pratishtha bjp ram kadam demand to ban liquor and meat in maharashtra cm eknath shinde
ayodhya ram mandir pran pratishtha bjp ram kadam demand to ban liquor and meat in maharashtra cm eknath shinde
social share
google news

BJP Ram Kadam Demand to Ban Liquor and Meat : देशभरात अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेची जोरदार तयारी सूरू आहे. अनेक राज्यातून प्रभू रामासाठी विविध गोष्टी पाठवल्या जात आहेत. त्यामुळे एकूणच संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. असे असताना भाजप आमदार राम कदम यांनी अयोध्येत प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी राज्यात दारू आणि मांसबंदी करावी अशी मागणी केली आहे. तसेच राज्य सरकारने केंद्र सरकारला या दिवशी संपूर्ण देशभरात दारूबंदीची विनंती करावी, अशी मागणी देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. आता राम कदमांच्या या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे काय निर्णय घेतात.हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (ayodhya ram mandir pran pratishtha bjp ram kadam demand to ban liquor and meat in maharashtra cm eknath shinde)

राम कदम यांनी एक्स या सोशल माध्यमावर एक पत्र पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एक लेटर आहे. या लेटरमध्ये त्यांनी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी राज्यात दारू आणि मासबंदी करण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

हे ही वाचा : Shreyas Talpade : “मी मेलो होतो, हा माझा दुसरा जन्म”, श्रेयसने सांगितला हार्ट अटॅकचा भयंकर अनुभव

जवळपास 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यात आले आहे. या राम मंदिराच्या निर्मितीसाठी अनेक कार सेवकांनी यातना भोगल्या आहे. प्रसंगी तुरूंगवासही भोगला आहे. त्यामुळे येत्या 22 जानेवारी 2024 रोजी उभारण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. हा दिवस महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात दिवासारखा साजरा करण्यासारखा आहे. त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात पवित्र दिवसाला एखाद्या सणाचे महत्व आले आहे. त्यामुळे या दिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दारू आणि मांसबंदी करण्यात यावी, अशी मागणी राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच संपूर्ण देशभरात आणि दारू आणि मांस बंदी व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला विनंती करावी, अशी मागणी देखील राम कदमांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : शिंदेंनी ‘तो’ मुद्दा छेडला, जितेंद्र आव्हाड भडकले; म्हणाले, “असे कृत्य घडू नये”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT