Rajasthan New CM : महंत बालकनाथांचा पत्ता कट? मोदींचं नाव घेत केला मोठा खुलासा

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Baba Balaknath was elected MP from Alwar Lok Sabha constituency on BJP ticket in 2019. This time the party had given him the ticket for the assembly elections from Tijara seat of the district.
Baba Balaknath was elected MP from Alwar Lok Sabha constituency on BJP ticket in 2019. This time the party had given him the ticket for the assembly elections from Tijara seat of the district.
social share
google news

Baba Balaknath : राजस्थानात भाजपने काँग्रेसला पराभवाची धूळ चारत स्पष्ट बहुमत मिळवलं. आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे, ते राजस्थानात भाजपचा मुख्यमंत्री कोण असणार? काही नावांची चर्चा दिल्लीपासून राजस्थानपर्यंत सुरू आहे. यात एक नाव आहे बाबा बालकनाथ यांचं. पण, त्यांनी केलेल्या एका खुलाशाने मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीतून पत्ता कट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ADVERTISEMENT

राजस्थानमधील तिजारा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार बाबा बालकनाथ यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची चर्चा सुरू असतानाच एक खुलासा केला आहे. एक्सवरील एका पोस्टद्वारे त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा >> “काय हे दादा? तुम्ही तर आमच्या इज्जतीचा…”, ठाकरेंचं फडणवीसांच्या वर्मावर बोट

बाबा बालकनाथ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच जनतेने खासदार आणि आमदार बनवून देशसेवेची संधी दिली. निवडणूक निकाल आल्यापासून मीडिया आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करा. मला अजूनही पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली अनुभव घ्यायचा आहे.”

हे वाचलं का?

आधी जिंकली लोकसभा आता विधानसभा निवडणूक

बाबा बालकनाथ 2019 मध्ये भाजपच्या तिकीटावर अलवर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. यावेळी त्यांना पक्षाने अलवर जिल्ह्यातील तिजारा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले होते. काँग्रेसचे उमेदवार इम्रान खान यांचा पराभव करून त्यांनी विधानसभेची निवडणूकही जिंकली. त्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचे अनेक दावेदार

निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाची मीडिया आणि सोशल मीडियात जोरात चर्चा होत आहे. मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये त्यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र, शनिवारी (९ डिसेंबर) त्यांच्या ट्विटवरून भाजपने त्यांच्यासाठी काही वेगळेच प्लॅनिंग केल्याचे दिसत आहे.

ADVERTISEMENT

बाबा बालकनाथ यांचे नाव वसुधरा राजे सिंधिया यांच्याही अगोदर घेतले जात असताना त्यांनी केलेल्या खुलाशाने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुख्यमंत्री होण्याबद्दल विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर काहीही प्रतिक्रिया न देणाऱ्या बाबा बालकनाथ यांनी अचानक मौन सोडल्याने वसुधरा राजे सिंधियाचे पारडे जड झाल्याचे म्हटले जात आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> फडणवीसांनंतर शिंदेंचा अजित पवारांना सल्ला, मलिकांबद्दल काय बोलले?

बालकनाथ यांच्याशिवाय राजस्थानच्या पुढील मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक चर्चेत असलेल्या नावांमध्ये वसुंधरा राजे सिंधिया, किरोरी लाल मीना, राज्यवर्धन सिंह राठोड आणि दिया कुमारी यांचा समावेश आहे.

बाबा बालकनाथ हे देखील त्याच नाथ संप्रदायाचे आहेत, ज्याचे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्याचे प्रमुख आहेत. बाबा बालकनाथ हे रोहतकच्या मस्तनाथ मठाचे महंत आहेत. 29 जुलै 2016 रोजी महंत चंदनाथ यांनी बालकनाथ योगी यांना उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. त्यांचे समर्थकही त्यांना ‘राजस्थानचा योग’ म्हणून संबोधतात.

बालकनाथ हे मस्तनाथ विद्यापीठाचे कुलपती

ते बाबा मस्तनाथ विद्यापीठाचे (BMU) कुलपतीही आहेत. बेहरोर तहसीलच्या कोहराना गावात एका यदुवंशी हिंदू कुटुंबात जन्मलेल्या बालकनाथ योगींची मुळे अलवरमध्ये खोलवर रुजलेली आहेत. त्यांनी वयाच्या साडेसहाव्या वर्षी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडून आश्रमात गेले.

महंत बालकनाथ योगी यांच्या राजकीय कारकीर्दीला त्यांचे गुरू महंत चांदनाथ यांनी आकार दिला, जे अलवरचे माजी खासदार होते. त्यांची प्रतिमा ‘हिंदू आणि हिंदुत्व’ याविषयी बोलणाऱ्या राजस्थानमधील एका फायरब्रँड नेत्यासारखी आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुलडोझर घेऊन अनेक ठिकाणी प्रचारही केला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT