Bacchu Kadu : बच्चू कडू एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना धक्का देणार?

भागवत हिरेकर

bacchu kadu sharad pawar meeting : बच्चू कडू यांनी शरद पवारांना भेटीसाठी घरी बोलावलं आहे. अचानक पवारांना चहासाठी बोलावल्याने वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. पण, महाराष्ट्रातील राजकारणाच्या अनुषंगाने ही भेट का महत्त्वाची आहे, हे समजून घ्या.

ADVERTISEMENT

why bacchu kadu and sharad pawar meeting important in maharashtra politics?
why bacchu kadu and sharad pawar meeting important in maharashtra politics?
social share
google news

Bacchu Kadu Sharad Pawar : राजकारणात नेत्यांच्या भेटीगाठी सहजच दाखवल्या जात असल्या, तरी त्या तशा नसतात. 2019 नंतर महाराष्ट्रात झालेले राजकीय भूकंप आणि बदललेलं राजकारण याची साक्ष देतंय. आता हे सांगण्याचं कारण म्हणजे बच्चू कडू आणि शरद पवारांची भेट. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या शब्दावर एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार कडू महायुतीला धक्का देण्याच्या विचारात असल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलून जातील.

उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या बच्चू कडूंचा शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये हिरमोड झाला. शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्री होण्याची बच्चू कडूंना आशा होती, मात्र ती मावळली आहे. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून बच्चू कडू थेट सरकार आणि भाजपवर हल्ला करताना दिसत आहेत. अशातच अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांना चहासाठी निमंत्रण दिल्याने बच्चू कडूंच्या मनात चाललंय काय? हा प्रश्न सध्या राजकारणात रस असलेल्यांना पडलाय.

बच्चू कडू महाविकास आघाडीत येणार?

आमदार कडू यांनी शरद पवारांना चहाला बोलवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. याचा अर्थ ते शिंदे फडणवीसांची साथ सोडण्याच्या मनस्थितीत आहे, असाही लावला जात आहे. कडू महाविकास आघाडीत येणार आहेत का? या प्रश्नाला पवारांनी वेगळंच उत्तर दिलं. ते म्हणाले, “कशावरून, तुमच्याकडे तशी माहितीये का? मी त्यांच्याकडे जातोय यामागे काही राजकीय हेतू नाही. एका विधानसभेच्या सदस्याने चहाला या म्हणून सांगितलं तिथे एवढी चर्चा करण्याचं कारण नाही.” शरद पवारांनी असं उत्तर देत चर्चेला तात्पुरता विराम दिला. पण, बच्चू कडूंच्या भूमिकेबद्दलची चर्चा कायम आहे. या मागे काही कारणंही आहेत.

हेही वाचा >> अजित पवारांचे पदाधिकारी ऐटीत फिरणार, 40 बोलेरो आणि 40 स्कॉर्पिओ दिल्या गिफ्ट

मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी

उद्धव ठाकरेंनी आपल्या सरकारमध्ये बच्चू कडूंना मंत्रिमंडळात घेतलं होतं. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर बच्चू कडू मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. मंत्री होण्याबद्दल त्यांनी त्या काळात लक्ष वेधून घेणारी विधानंही केली होती. पण, अपंग कल्याण विभाग निर्माण करून आणि त्याचे अध्यक्षपद देऊन शिंदे-फडणवीसांनी त्यांची बोळवण केली. त्यामुळे बच्चू कडू नाराज दिसले.

हे वाचलं का?

    follow whatsapp