Lok Sabha 2024 : काँग्रेसचे 12 खासदार, 40 आमदार भाजपत जाणार? 

मुंबई तक

ADVERTISEMENT

काँग्रेसचे 12 खासदार आणि 40 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा दिल्लीत सुरू आहे.
The BJP has formed a four-member committee to induct leaders from other parties, including the Congress.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणुकी आधी होणार राजकीय भूकंप?

point

काँग्रेसचे खासदार आणि आमदार भाजपच्या वाटेवर

point

भाजपची विरोधी पक्षातील ताकदवान नेत्यांवर नजर

Lok Sabha 2024 election BJP Congress : भाजपने लोकसभा निवडणुकीत 370 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे. मतदारसंघनिहाय पक्षाच्या ताकदीचा आढावा घेऊन भाजपने देशभरातील इतर पक्ष्यातील नेत्यांना आपल्या बाजूने आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून, काँग्रेसचे महाराष्ट्रासह इतर राज्यातील 12 खासदार आणि 40 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा दिल्लीत सुरू आहे. 

ADVERTISEMENT

'लोकमत'ने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. भाजपने काँग्रेससह इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात सामावून घेण्यासाठी एक चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सरचिटणीस विनोद तावडे, बी.एल.संतोष, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांचा या समितीमध्ये समावेश आहे. 

काँग्रेसचे 12 खासदार भाजपच्या वाटेवर

सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसचे डझनभर म्हणजे १२ खासदार आणि ४० आमदार टप्प्याटप्प्याने भाजपमध्ये प्रवेश करतील. महाराष्ट्र, आसाम, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश या राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष आहे. त्यानुषंगाने भाजपमध्ये हालचाली सुरू आहेत. 

हे वाचलं का?

भाजपने २०१९ मध्ये ज्या जागा जिंकल्या आहेत, त्यांच्याबरोबर ज्या जागांवर पक्ष लढला नव्हता किंवा दुसऱ्या क्रमांकावर उमेदवार राहिलेल्या मतदारसंघावरही लक्ष्य केंद्रीत केलं आहे. या ठिकाणी विजय मिळवण्यासाठी भाजपने ताकद लावलेली आहे. अशा मतदारसंघाच्या दृष्टीने भाजपने तिथे वर्चस्व असलेल्या विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या बाजूने करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी चर्चा आहे.

महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहे. त्यापैकी ४५ जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष आहे. यानुषंगाने इतर पक्षातील नेत्यांना सामावून घेण्याचे भाजपचे प्रयत्न असून, यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. अनेक नेते भाजपत येण्याची तयारीत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

ADVERTISEMENT

"मोदीजींना साथ देण्यासाठी कुणी भाजपमध्ये येत असेल, तर आमचा दुपट्टा तयार आहे. आम्ही कुणालाही भाजपमध्ये घ्यायला तयार आहे. आमच्या स्पेस आहे. आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही", असे बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्के बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT