CM Shinde: ‘मी पुढचे 8 महिने…’, मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

रोहित गोळे

ADVERTISEMENT

before mla disqulification case decision eknath shinde big statement about post of chief minister said i am cm for next eight more months
before mla disqulification case decision eknath shinde big statement about post of chief minister said i am cm for next eight more months
social share
google news

Eknath Shinde Statement on CM Post: मुंबई: शिवसेनेत बंड झाल्यापासून ते थेट शिवसेना (Shiv Sena) पक्षच आपल्या ताब्यात घेणाऱ्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या आमदारांवर सध्या अपात्रतेची टांगती तलवार आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी पक्षात बंडखोरी केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशी याचिका शिवसेना (UBT) कडून करण्यात आली आहे. ज्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मॅरेथॉन सुनावणी पार पडली. ज्याचा निकाल आता अवघ्या पाच दिवसात येणं अपेक्षित आहे. असं असताना दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाबाबत एक अत्यंत मोठं विधान केलं आहे. (before mla disqulification case decision eknath shinde big statement about post of chief minister said i am cm for next eight more months)

ADVERTISEMENT

जर अपात्रतेचा निकाल हा एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गेल्यास त्यांना मुख्यमंत्री पद देखील सोडावं लागू शकतं. मात्र, असं असतानाही एकनाथ शिंदेंनी काल (4 डिसेंबर) जाहीरपणे असं म्हटलं की, पुढील आठ महिने तेच मुख्यमंत्री असणार आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाबाबत नेमकं काय म्हणाले?

आमदार अपात्रतेच्या निर्णयापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं विधान केलं आहे. ‘मी अजून आठ महिने मुख्यमंत्री आहे. त्यामुळे आपल्याला फिरावं लागणार आहे.’ असं शिंदे म्हणाले.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> ‘…तर एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही’, मलंगगडावरून मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

पालघर जिल्ह्यातील विरोधी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्याचवेळी ते बोलत होते. याच वेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत विधान केलं आहे.

अपात्रतेच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष

उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केलं. पण याच विरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ज्यावर कोर्टात प्रदीर्घ सुनावणी झाली होती. त्यानंतर कोर्टाने महाराष्ट्रातील या सगळ्या राजकीय निर्णय प्रक्रियेवर जोरदार ताशेरे ओढले. मात्र, शिंदे यांचं सरकार हे कायम ठेवलं होतं. पण याचवेळी आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्देश दिले होते.

ADVERTISEMENT

सुरुवातीला कोर्टाने विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत आमदार अपात्रतेचा निकाल घ्यावा असं म्हटलं होतं. मात्र, अनेक महिने उलटून गेल्यानंतरही विधानसभा अध्यक्षांकडून याबाबत म्हणावी तशी कार्यवाही न झाल्याने कोर्टाने त्यांना थेट डेडलाइन ठरवून दिली. त्यानंतर राहुल नार्वेकरांनी सलग सुनावणी घेतली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Rashmi Shukla: मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ शुभेच्छांनी ठाकरेंची मोठी पंचाईत?

या याचिकेवर 31 डिसेंबर 2023 पर्यंत निकाल द्यावा असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता. मात्र, निकाल तयार करण्यास अधिक वेळ लागू शकतो असं म्हणत नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाकडे निकालासाठी वेळ वाढवून मागितली होती. कोर्टाने देखील त्यांचं हे म्हणणं ग्राह्य धरून 10 जानेवारी 2024 पर्यंत वेळ वाढवून दिली. आता याच बहुप्रतिक्षित निकालासाठी आता अवघे पाच दिवस उरले आहेत.

‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एवढा आत्मविश्वास कुठून आला?’

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत.. त्यांचा आत्मविश्वास कुठून आला? हे पाहावं लागेल..’ अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT