Rohit Patil: शरद पवार की अजित पवार.. R. R. पाटलांचा मुलगा कोणाच्या बाजूने?

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

big split in the NCP. In that R. R. Patil's son Rohit Patil has announced his support to Sharad Pawar.
big split in the NCP. In that R. R. Patil's son Rohit Patil has announced his support to Sharad Pawar.
social share
google news

Maharashtra Politics Update Today: कराड: राज्याचे माजी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) काही आमदारांना घेऊन शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) जाऊन मिळाले आणि काल (2 जुलै) त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देखील घेतली. या शपथविधीनंतर तात्काळ पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा सांगितला आहे. पण यानंतर शरद पवार (Shara Pawar) यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन ‘मी राज्यभर फिरुन पक्ष पुन्हा उभारेन’, असा निर्धार व्यक्त केला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार एकमेकांसमोर उभे ठाकणार, हे आता निश्चित झालं आहे. दरम्यान, या सगळ्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील (R. R. Patil) यांचा मुलगा रोहित पाटील (Rohit Patil) याची जोरदार चर्चा सुरू आहे. (big split ncp maharashtra r r patil son rohit patil support to sharad pawar ajit pawar ncp latest update on maharashtra politics)

ADVERTISEMENT

आर. आर. पाटलांचे सुपुत्र रोहित पाटील नेमकं कोणाच्या बाजूने?

दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी शरद पवार हे आज (3 जुलै) कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ असलेल्या प्रीती संगमावर दाखल झाले आहेत. याठिकाणी शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील प्रीतीसंगमावर दाखल झाला होता.

हे ही वाचा >> NCP : अजित पवारांच्या बंडाची स्क्रिप्ट लिहिली गेली होती एप्रिलमध्येच?

सध्या राष्ट्रवादीत कोण नेते कोणत्या पवारांच्या पाठिशी आहे याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. असं असताना रोहित पाटील हे शरद पवारांसोबतच प्रीती संगमावर पोहचल्याने ते नेमके कोणाच्या पाठिशी आहेत असा जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा रोहित पाटील म्हणाले की, ‘आपली निष्ठा शरद पवारांच्या चरणीच आहे.’

हे वाचलं का?

‘अजित पवारांच्या निर्णयामुळे फार फरक पडणार नाही, पक्ष पुन्हा…’

‘आज गुरुपौर्णिमा असल्याने आम्ही नव्या महाराष्ट्राच्या निर्मितीत मोठा वाटा असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या मुशीत घडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही घडलं ते अपेक्षित नव्हते. हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का होता.’

फोटो सौजन्य: Instagram

 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maharashtra Politics Live Updates : अजित पवारांचं बंड, शरद पवार मैदानात!

‘परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवार साहेबांच्या निर्णयांमुळे, धोरण आणि विचारधारेमुळे तळागाळापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे काल जे काही घडले त्याने फार फरक पडेल, असे वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पु्न्हा सर्वसामान्यांच्या ताकदीवर उभारी घेईल. आम्ही पवार साहेबांच्या सोबत आहोत. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच आम्ही याठिकाणी आलो आहोत.’ असे रोहित पाटील यांनी म्हटले.

ADVERTISEMENT

एकीकडे अजित पवार हे आपला राजकीय खुंटा बळकण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहेत. तर दुसरीकडे आजवर अनेक राजकीय वादळांना परतवून लावणारे शरद पवार त्याच ताकदीने मैदानात उतरले आहेत. अशावेळी कोणते पवार बाजी मारणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT