Kirit Somaiya यांचा ठाकरेंकडून तीनदा ‘गेम’, अमित शाहांसमोरच..; नेमका वाद काय?
भाजप नेते किरीट सोमय्यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओनंतर ते आता ठाकरे गटाच्या रडारवर आले आहेत. मात्र याआधी युतीत सरकार असताना तीन वेळा उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्या यांना राजकीयदृष्ट्या नामोहरम केलेलं. जाणून घ्या त्याविषयी सविस्तर.
ADVERTISEMENT

Kirit Somaiya Viral Video: मुंबई: भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे कथित आक्षेपार्ह व्हिडीओ (allegedly offensive video) व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यातही शिवसेना (UBT)पक्षाच्या नेत्यांनी आता सोमय्यांना खिंडीत पकडण्यासाठी नवी व्यूहरचना केली आहे. मात्र, ठाकरे गटासाठी (Thackeray Faction) किरीट सोमय्या हे मागील काही वर्षांपासून ‘टार्गेट’ का राहिले आहेत याचविषयी आम्ही आपल्याला सविस्तरपणे सांगणार आहोत. (bjp leader kirit somaiya video controversy thackeray faction uddhav thackeray politically ostracized somaiya 3 times shiv sena ubt)
ठाकरेंनी कसा केलेला किरीट सोमय्यांचा तीनदा गेम?
1. ठाकरेंकडून सोमय्यांचा पहिला गेम: 2014 विधानसभा निवडणुकांदरम्यान शिवसेना आणि भाजपची युती तुटली. पण निकालानंतर हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले. त्यानंतर सरकार चालवित असताना दोन्ही पक्षांमध्ये सुंदोपसुंदी ही सुरूच होती. मात्र, 2017 साली जेव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा पुन्हा एकदा या दोन्ही पक्षातील वाद चव्हाट्यावर आला होता.
त्यावेळी देखील शिवसेना-भाजपची युती होऊ शकली नव्हती. ज्यानंतर पालिकेच्या प्रचारसभांदरम्यान भाजपने शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. ज्यामध्ये किरीट सोमय्या हे अग्रस्थानी होती.
भाजपमधील ते एकमेव नेते होते की, त्यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दरम्यान, महापालिका निवडणुकीत अगदी काहीशा फरकाने शिवसेनेने बाजी मारली होती. त्यानंतर भाजपने राज्यातील आपलं सरकार स्थिर राहावं या दृष्टीने महापौर निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे मधल्या काळात जे आरोप-प्रत्यारोप झाले होते ते काहीसे मागे पडले होते.