Mumbai Tak Chavadi: ‘उद्धवजींचे खेळ आणि चाळे, मीच शहाणा..’ आशिष शेलारांची जहरी टीका

ऋत्विक भालेकर

Mumbai Tak Chavadi उद्धव ठाकरे यांच्यामुळेच 2014 साली शिवेसना-भाजप युती तुटली.. असा आरोप आशिष शेलार यांनी मुंबई Tak च्या चावडीवर बोलताना केला आहे. पाहा आशिष शेलार नेमकं काय म्हणाले.

ADVERTISEMENT

bjp mla ashish shelar venomous criticism on uddhav thackeray mumbai tak chavadi said alliance was broken due to uddhav thackerays games and tricks political news maharashtra
bjp mla ashish shelar venomous criticism on uddhav thackeray mumbai tak chavadi said alliance was broken due to uddhav thackerays games and tricks political news maharashtra
social share
google news

Ashish Shelar BJP: मुंबई: ‘उद्धवजींचे खेळ आणि चाळे, हेतू आणि उद्देश हे बघितल्यावर लहान बालकही उद्धवजींच्या मनात काय चाललंय हे स्पष्ट कळत होतं.’अशा जहरी शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई Tak चावडीवर (Mumbai Tak Chavadi) उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली. (bjp mla ashish shelar venomous criticism on uddhav thackeray mumbai tak chavadi said alliance was broken due to uddhav thackerays games and tricks political news maharashtra)

मुंबई Tak च्या चावडीवर गप्पा मारताना आशिष शेलारांनी अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरं दिली. मात्र, याचवेळी 2014 साली जी युती तुटली त्याबाबत बोलताना शेलारांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. पाहा चावडीवर आशिष शेलार नेमकं काय-काय म्हणाले.

‘उद्धवजींचे खेळ आणि चाळे..’

‘उद्धवजींचे खेळ आणि चाळे, हेतू आणि उद्देश हे बघितल्यावर लहान बालकही उद्धवजींच्या मनात काय चाललंय हे स्पष्ट कळत होतं. मला वाटतं त्याही वेळेला उद्धवजी अहंकारापोटी, तिरस्कारापोटी आणि मीच शहाणा या भूमिकेपोटी भाजपला हिडीसफिडीस करत होते. आज झालेल्या उद्धवजींच्या पक्षाची अवस्था ही त्यांच्या अंहकारी वागण्यातूनच झालेली आहे.’ अशी जहरी टीका शेलारांनी यावेळी केली.

‘मला वाटतं की, एकनाथ खडसे जे आज बोलत आहेत ते अर्ध खोटं नाही संपूर्ण खोटं बोलतायेत.. याचं कारण खडसेंनी थोडं मागे गेलं तर लक्षात येईल. ज्याचा अर्धा उल्लेख त्यांच्या.. मी पाहिली त्यांची ती मुलाखत.. त्यामध्ये ते म्हणाले की, मी स्वत: मुक्ताईनगरला होतो असं ते म्हणाले.. खरं तर त्यावेळेला तिथे होतो. मी मुंबईचा अध्यक्ष होतो.. विनोद तावडे, फडणवीस.. निरीक्षक ओम माथूर होते. या अगोदरच्या घटनाक्रमाकडेही पाहायला लागेल. सोयीस्कररित्या एकनाथ खडसे ते विसरलेले दिसतायेत.’

हे वाचलं का?

    follow whatsapp