Manoj jarange : नितेश राणेंचा जरांगेंना इशारा, 'सागर बंगल्याची भिंत ओलांडून...'

प्रशांत गोमाणे

BJP Nitesh rane challenge to manoj jarange patil on Maratha Reservation : जरांगेंच्या या इशाऱ्यानंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आक्रमक झाले आहेत. जरांगेंना 'सागर बंगल्याची भिंत ओलांडण अवघड जाईल, असा प्रतिइशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

ADVERTISEMENT

bjp nitesh rane challenge to manoj jarange patil on maratha reservation devendra fadnavis allegatiom sagar bunglow antarwali sarati
जरांगेंच्या या इशाऱ्यानंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आक्रमक झाले आहेत. जरांगेंना 'सागर बंगल्याची भिंत ओलांडण अवघड जाईल, असा प्रतिइशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
social share
google news

BJP Nitesh rane challenge to manoj jarange patil on Maratha Reservation :  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर चांगलेच आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटलांनी अंतरावली सराटीतील मराठा समाजाच्या बैठकीतून थेट सांगर बंगल्यावर जाण्याचा इशारा दिला आहे. जरांगेंच्या (manoj jarange) या इशाऱ्यानंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आक्रमक झाले आहेत. जरांगेंना 'सागर बंगल्याची भिंत ओलांडण अवघड जाईल, असा प्रतिइशारा नितेश राणे यांनी दिला आहे. ( bjp nitesh rane challenge to manoj jarange patil on maratha reservation devendra fadnavis allegatiom sagar bunglow antarwali sarati)  

'तुला माझा बळी घ्यायचा ना... तुला माझा बळी पाहिजे ना, मी सागर बंगल्यावर येतो घे माझा बळी. मी इथे उपोषण करून मरण्यापेक्षा मी तुझ्या सागर बंगल्यावर पायी येतो,असे म्हणत जरांगेंनी स्टेजवरून खाली उतरत मुंबईच्या दिशेने पायी निघाले आहेत. यावेळी अनेक मराठा कार्यकर्त्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र जरांगे काही शांत झाले नाही आहेत. ते मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. 

हे ही वाचा : Manoj Jarange : 'आम्ही सांगितलं होतं फडणवीसांचं नाव...', भाजप आमदार जरांगेंना काय बोलला?

दरम्यान जरांगेंनी सागर बंगल्यावर जाण्याचा इशारा दिल्यानंतर भाजप नेते नितेश राणे देखील आक्रमक झाले आहेत. जरागेंचा हा लढा मराठा आरक्षणासाठीचा आहे की देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी आणि राजकारण करण्यासाठी असा सवाल नितेश राणे यांनी जरांगेंना केला आहे. तसेच जरांगेंच्या हाती कुणाची स्क्रिप्ट आहे, त्यांच्या स्क्रिप्टमधून आता तुतारीचा वास येऊ लागलाय,अशी टीका नितेश राणे यांनी जरांगेवर केली आहे.

तसेच हा लढा मराठा समाजाचा असेल तर त्यांनी तो समाजापर्यंतच मर्यादीत ठेवावा असा सल्ला देखील नितेश राणे यांनी जरांगेंना दिला. त्यासोबत सांगर बंगल्यापुढे एक भिंत आहे ती ओलांडणे त्यांना अवघड जाईल,असा इशारा नितेश राणे यांनी जरांगेंना दिला आहे. नितेश राणे यांनी टीव्ही 9  मराठीला प्रतिक्रिया दिली होती. 

हे वाचलं का?

    follow whatsapp