Politics News in Marathi : भाजपचा 2024 साठी काय आहे ‘घर वापसी’ प्लान?
2024 मध्ये विरोधकांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी एनडीएशी संबंध तोडलेल्या मित्रपक्षांना पुन्हा सोबत घेण्यासाठी भाजपने (bjp political news) काम सुरू केले आहे.
ADVERTISEMENT

latest news on BJP party : लोकसभा निवडणुकीला वर्षभराहून कमी काळ शिल्लक असला, तरी बेरजेच्या राजकारणाला वेग आला आहे. राजकीय समीकरणे आणि विविध पक्षाशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला जाताना दिसत आहे. देशात सलग तिसर्यांदा भाजपची सत्ता येण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्ष परस्पर ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच वेळी दुसरीकडे, 2024 मध्ये विरोधकांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी एनडीएशी संबंध तोडलेल्या मित्रपक्षांना पुन्हा सोबत घेण्यासाठी भाजपने (BJP political news) काम सुरू केले आहे. चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीपासून ते ओमप्रकाश राजभर यांच्या सुभासपापर्यंत, अनेकांची एनडीएमध्ये (BJP politics in india) घरवापसी करून घेण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जात आहे.
टीडीपी-भाजपसोबत पुन्हा युती!
TDP अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीबाबत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि टीडीपीच्या युतीवर शिक्कामोर्तब होणार आहे. भाजप आणि टीडीपी केवळ आंध्र प्रदेशातच नव्हे तर तेलंगणा विधानसभा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकाही युतीत लढणार आहेत.
हेही वाचा >> भाजप-शिवसेनेत जागावाटपावरून ठिणगी, शिंदेंच्या मंत्र्यांने दिला इशारा!
2024 मध्ये लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तर तेलंगणात या वर्षी निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत टीडीपीसोबत आघाडी करून दोन राज्यांतील विधानसभा निवडणुका लढविण्याचे मान्य करण्यात आले असून, लवकरच दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा होणार आहे. आंध्र प्रदेशात टीडीपी मोठ्या भावाची तर तेलंगणात टीडीपी भाजपच्या लहान भावाची भूमिका बजावणार आहे.
2018 मध्ये तुटली होती टीडीपी-भाजप युती
खरेतर, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे 2018 मध्ये आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून टीडीपीने एनडीएपासून फारकत घेतली होती. भाजप-टीडीपी युती तुटल्याने आंध्र प्रदेश विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांचे नुकसान झाले होते. टीडीपीला विधानसभा निवडणुकीत 23 जागा आणि लोकसभेत तीन जागा मिळाल्या, तर भाजपला खातेही उघडता आले नव्हते. तेलंगणातही राजकीय भवितव्य असेच होते. येथे भाजपचा एक आमदार आणि टीडीपीचे दोन आमदार निवडून आले होते.