Chandrasekhar Bawankule : ‘जर तुम्ही लिमिट सोडलं तर आम्हीही…’; उद्धव ठाकरेंना भाजपनं सुनावलं….
Chandrasekhar Bawankule : उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताच आता भाजपने ठाकरेंची सगळी कुंडलीच काढली आहे.
ADVERTISEMENT
Chandrasekhar Bawankule : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. विरोधी पक्षनेते पदे असलेल्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन त्यांनी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील आमदारांना घेऊन भाजपबरोबरच्या सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. त्यातच काल रविवारी बड्या नेत्यांच्या सभा वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या, त्यातूनही एकमेकांवर सडकून टीका करण्यात आली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्या जन्मापासून सुरु झालेला आणि त्यांना मिळालेला राजकीय वारशावरुन त्यांच्या बोचरी टीका केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने आल्याचे दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
ठाकरेंना उंची गाठता आली नाही
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, उद्धव ठाकरे हे सोन्याचा चमचा आणि बदामाचा ज्यूस घेऊन जन्माला आले आहेत. राजकारणाचा वारसा त्यांना त्यांच्या जन्मापासून मिळाला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे त्यांना राजकारणात त्यांच्याएवढी उंची गाठता आली नाही. त्यामुळेच ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असल्याची आरोप केला आहे.
हे ही वाचा >> Chhagan Bhujbal: पवारांवर बोलताच भरसभेत गोंधळ, भुजबळांना कोणी रोखलं; बीडमध्ये काय घडलं?
टीका करत राहा
उद्धव ठाकरे यांनी आमच्यासह आमच्या नेत्यांवर टीका करत राहा. तुम्ही जितका अपमान करत राहाल तितके आम्ही मोठे होऊ अशा शब्दात त्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिला आहे. उद्धव ठाकरे टीका करतात कारण त्यांच्याकडून सरकार आणि त्यांचे पद गेले असल्यामुळेच ते भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात.
हे वाचलं का?
उद्धवस्त मनस्थिती
उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री गेले, त्यांच्यासोबतचे सहकारी गेल्यामुळे त्यांचे रोज पतन होत आहे. त्यंच्याच पक्षातील त्यांचे लोक त्यांना सोडून चालले आहेत. सहकारी गेल्यामुळे ते सध्या उद्धवस्त मनस्थितीमध्ये आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून जर सातत्याने अशी टीका होत असेल तर मात्र मुंबईत एक दिवस त्याचा उद्रेक होईल. त्यामुळे तुम्ही जर लिमिट सोडत असला तर आम्हीही लिमिट सोडू असा इशाराच त्यांनी त्यांना दिला आहे. त्यासाठी आम्ही रस्त्यावरही उतरु अशा शब्दात त्यांनी त्यांना ठणकावून सांगितले आहे.
हे ही वाचा >> Shiv Sena UBT: ‘भाजपच्या पलंगावर गेल्यापासून अजित पवारांना सत्काराचे…’, ‘सामना’तून जहरी टीका
घरी जाण्याचीच घाई
चंद्रशेखर बावनकुळे यांनी परदेश दौऱ्यावरूनही उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरे 15 दिवस विदेशात जाऊन आराम करून आले आहेत तर देवेंद्र फडणवीस मात्र 5 दिवस राज्यासाठी जपान गेले होते. तरीही जर तुम्ही टीका करत असाल तर तुमच्याप्रमाणेच आम्हीही तुम्हाला उत्तर देऊ. या सर्व गोष्टींच्या ताणतणावमुळेच उद्धव ठाकरे यांना कुठल्याही सभेला उशीर होतो. ते सभेला दुपारी तीन वाजता आले तरी त्यांना घरी जाण्याचीच घाई असते अशा शब्दात उद्धव ठाकरे यांचा त्यांनी समाचार घेतला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT