MOTN 2024: मध्यप्रदेशमध्ये भाजपला बसणार मोठा झटका, लोकसभेत किती मिळणार जागा?

मुंबई तक

bjp madhya pradesh lok sabha 2024 congress mood of the nation

ADVERTISEMENT

bjp comgress
political
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मध्यप्रदेशमध्ये भाजपला बसणार झटका

point

मध्यप्रदेश भाजपच्या जागा कमी होणार?

point

मध्य प्रदेशमध्ये भाजपची काय स्थिती असणार

Mood of The Nation: देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचे (Lok sabha election) वारे वाहू लागले आहेत, त्यामुळे मध्य प्रदेशमध्येसुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. मध्य प्रदेशात लोकसभेच्या 29 जागा आहेत. मागील निवडणुकीत भाजपला 29 पैकी 28 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी माजी मुख्यमंत्री कमलनाथ () यांचे पुत्र नकुल नाथ छिंदवाडा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यामुळे आता आगामी निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले  आहे. 

मूड ऑफ नेशनच्या सर्वेक्षणात मध्य प्रदेशमध्ये भाजपला 58 टक्क्यांहून अधिक मते मिळाली तर काँग्रेसला 38.2 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसला फक्त एक जागा

मूड ऑफ नेशननुसार, मध्य प्रदेशात भाजपला 27 जागा मिळण्याची शक्यता आहे.  तर काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागेत आहे. या सर्वेक्षणानुसार या निवडणुकीत काँग्रेसला एक जागा मिळू शकते, तर त्यावेळी काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती.

मध्य प्रदेशमध्या भाजपला बसणार मोठा धक्का
mood of the nation

मोदींवर विश्वास

लोकसभेच्या निवडणुकीत 29 पैकी 27 जागा मिळाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले होते की, आम्ही 29 पैकी 29 जागा जिंकणार. भाजपला मिळालेल्या मिळालेल्या प्रादेशिक शक्तीमुळे मध्य प्रदेशातून 100 टक्के निकाल देईल असा विश्वास व्यक्त केला गेला होता. कारण मध्य प्रदेशातील जनता ही आमच्यासोबत आहे. मतदानातून जनतेचा विश्वास दिसून येत असल्यामुळेच विधानसभा निवडणूक जिंकली आहे असंही त्यांनी विश्वासानं सांगितले होते.

प्रगती देशाची

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मूड ऑफ द नेशन सर्व्हेवर सांगितले की, भाजप मध्य प्रदेशातील 29 पैकी 29 जागा जिंकणार आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेल्या विश्वासामुळेच त्यांनी भाजपला मतं दिल्याचेही त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशची जनता ही त्यांच्यावर प्रचंड प्रेम करते, कारण नरेंद्र मोदी यांनी देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांचा सगळ्यांना त्यांचा अभिनान वाटतो असंही त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजना या गरीब कल्याणाच्या योजना आहेत. त्यांनी दिलेल्या हमीभावामुळेच आपलं जीवन बदलल्याचंही त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

    follow whatsapp