ब्रेकिंग न्यूज: शरद पवारांच्या निर्णयानंतर हाय होल्टेज ड्रामा! जयंत पाटील ढसाढसा रडले

मुंबई तक

ADVERTISEMENT

breaking news after sharad pawar decision to resign high voltage drama was seen jayant patil cried profusely
breaking news after sharad pawar decision to resign high voltage drama was seen jayant patil cried profusely
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आज (2 मे) ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं. पण याचवेळी केलेल्या भाषणात शरद पवार यांनी एक प्रचंड मोठी घोषणा करुन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून टाकलं. आपल्या भाषणात बोलताना शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं घोषित केलं. शरद पवार यांनी केलेल्या या घोषणेनंतर सर्वच उपस्थितांना मोठा धक्का बसला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना सभागृहातच अडवून ठेवलं आणि त्यांचा निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भाषण करताना रडू कोसळलं. यावेळी जयंत पाटील (Jayant Patil) हे ढसाढसा रडल्याचं पाहायला मिळालं. (breaking news after sharad pawar decision to resign high voltage drama was seen jayant patil cried profusely)

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर हाय होल्टेज ड्रामा

शरद पवारंची राजीनाम्याची घोषणा करताच सभागृहात एकच गडबड-गोंधळ सुरु झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी शरद पवार यांना तिथेच अडवलं आणि प्रत्येक नेत्यांने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तसंच सर्व नेत्यांनी शरद पवार आपण आपली घोषणा मागे घ्यावी अशी विनंती केली. यावेळी जयंत पाटील भाषणात असंही म्हणाले की, ‘हा पक्ष ज्यांना चालवायचा असेल त्यांना चालवू द्या.’ यावेळी जयंत पाटील यांना प्रचंड रडू कोसळलं. पाहा जयंत पाटील यावेळी नेमकं काय म्हणाले:

‘आतापर्यंत आम्ही पवार साहेबांच्या नावाने मतं मागतो.. पक्षाला मतं पवार साहेबांमुळे मिळतात. आज पवार साहेबच बाजूला गेले तर आम्ही लोकांसमोर काय तोंड घेऊन जायचं? हा आमचा पहिला प्रश्न आहे. अजूनही पवार साहेब यांनी पक्षाचं प्रमुख नेते पद राहणं हे महाराष्ट्रापुरतंच नाही तर देशातल्या राजकारणासाठी, देशातल्या लोकांसाठी आणि वेगवेगळ्या राज्यातील लोकांसाठी देखील गरजेचं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब या नावानेच ओळखला जातो.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Sharad Pawar : शरद पवारांची घोषणा! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार

‘असं अचानक पवार साहेबांनी बाजूला जाण्याचा पवार साहेबांनाही अधिकार नाही. त्यांना परस्पर असा निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांचा हा निर्णय आम्हा कोणालाही मान्य होणार नाही. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो की, त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा.’

‘त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वांना अजूनही इथून पुढे पाहिजे. आमच्या लहानपणापासून (जयंत पाटलांना रडू आवरेना) त्यांना बघून आम्ही राजकारण केलं. आजही त्यांच्याकडूनच आम्ही स्फूर्ती घेऊन राजकारण करतो.’

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> शरद पवारांची निवृत्ती : कार्यकर्त्यांचा सभागृहातच गोंधळ, घोषणा मागे घेण्याची मागणी

‘त्यांनी अलिकडच्या काळात भाकरी फिरवण्याची भाषा काही दिवसांपूर्वी केली. पवार साहेब तुम्हाला आम्ही सगळे अधिकार देतो. पण देशाच्या सर्वोच्च ठिकाणी तुमची जी प्रतिमा आहे ती कोणालाही दुसऱ्याला येणार नाही. तुम्ही आम्हा सगळ्यांचे राजीनामे घ्या.. तुम्हाला पक्ष कसा नव्या लोकांच्या हातात द्यायचाय तो द्या. (रडू आवरेना) पण पक्षाच्या प्रमुख पदावरून बाजूला जाणं हे पक्षातल्या, देशाच्या, तरुणांच्या देखील हिताचं नाही. आम्हाला आपल्या छायेखाली काम करण्याची सवय लागली आहे. तुम्ही बाजूला जाऊन आम्ही कोणीच काम करू शकणार नाही. तुम्ही थांबणार असाल तर आम्ही सगळे थांबू (रडू कोसळलं) हा पक्ष ज्यांना चालवायचा असेल त्यांना चालवू द्या.’ असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT