Maharashtra Politics : खैरे-दानवेंनी वाढवला ठाकरेंचा ताण, मातोश्रीवरील बैठकीत काय झालं?

ऋत्विक भालेकर

Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha election 2024 : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे दोन नेते लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांच्यात यावरून जुंपली असून, ठाकरेंना मातोश्रीवर बैठक घ्यावी लागली.

ADVERTISEMENT

Ambadas Danve and chandrakant khaire willing to contest lok sabha election 2024 from Chhatrapati Sambhaji Nagar.
Ambadas Danve and chandrakant khaire willing to contest lok sabha election 2024 from Chhatrapati Sambhaji Nagar.
social share
google news

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : शिवसेनाचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ) लोकसभा मतदारसंघात दोन नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ताण वाढवला आहे. शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ठाकरेंचे दोन नेते इच्छुक असून, दोन्ही नेत्यांमध्येच जुंपलीये.त्यामुळे ठाकरेंना तातडीने मातोश्रीवर बैठक बोलवावी लागली. दरम्यान, ठाकरेंना दोन्ही पैकी एकाच नेत्याला संधी देता येणार आहे. ज्या नेत्याला तिकीट मिळणार त्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑफर दिली जाऊ शकते, अशी माहिती समोर आलीये… पडद्यामागे काय घडलं हेच समजून घ्या…

ठाकरे गटातीलच दोन नेत्यांमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यावरून जुंपलीये. माजी खासदार चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. दुसरीकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही मैदानात उतरले आहेत.

दानवे-खैरेंची भूमिका काय?

लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना अंबादास दानवे म्हणालेले की, “मी शिवसैनिक आहे. पक्षप्रमुख जिथे सांगतील तिथे लढण्याची माझी तयारी आहे. कुठेही लढायला सांगितलं… फक्त निवडणूक नाही, तर कोणतीही लढाई लढायला सांगितली तरी ती लढण्याची माझी शंभर टक्के तयारी आहे. मागच्या १० वर्षांपासून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.”

हेही वाचा >> ‘वंचित’ने सांगितलं किती हव्यात जागा? मांडला ‘मविआ’चा फॉर्म्युला

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलेल्या चंद्रकांत खैरेंनी मात्र वेगळी भूमिका मांडली. “अंबादास दानवेंना निवडणूक लढवण्याची इच्छा होती म्हणून मागच्या निवडणुकीत माझा पराभव झाला. छत्रपती संभाजीनगरची निवडणूक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील ते लढवतील. होईल ना चांगलं. कशाला काळजी करायची. जनतेची जी इच्छा आहे, ती उद्धव ठाकरे मान्य करतील”, असं म्हणत खैरेंनी त्यांची इच्छा बोलून दाखवली.

हे वाचलं का?

    follow whatsapp