यमाच्या रेड्यावर बसून मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांची मौज, सामनातून सरकारवर आगपाखड

ADVERTISEMENT

Chief Minister 2 Deputy Chief Ministers fun sitting on Yam buffalo fire on the government from match
Chief Minister 2 Deputy Chief Ministers fun sitting on Yam buffalo fire on the government from match
social share
google news

Saamana Editorial : नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपुरातील (Nanded, Chhatrapati Sambhajinagar, Nagpur) शासकीय रुग्णालयातील (Government Hospital) रुग्णांचा मृत्यू (Death of patients) झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली. शासकीय रुग्णालयामध्ये बालकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने अनेक सवाल उपस्थित केले गेले आहेत. त्यावरून आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर आगपाखड करण्यात आली आहे. सरकारवर टीका करताना मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना यमाच्या रेड्यावर बसून मौज करत असल्याची गंभीर टीका सामनातून केली गेला आहे. राज्यातील सरकारकडे आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत, मात्र शासकीय रुग्णालयातील औषधोपचारांसाठी पैसे नसल्याचा आरोप करत रुग्णालयातील रुग्णांचा झालेला मृत्यू हा महाराष्ट्राला काळिमा फासणारा असल्याची टीका त्यांनी केली आहे.

आमचेच राजकारण चालावे

राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असतानाच शिंदे-फडणवीस-पवारांचे सरकार मात्र राजकाणात व्यस्त असल्याची टीका सामनातून केली आहे. राज्यातील जनतेच्या आरोग्यापेक्षा या सरकारला राजकारण महत्वाचे वाटत असून आमचेच राजकारण चालावे यासाठी आटापिटा चालू असल्याची टीकाही सरकारवर करण्यात आली आहे.

हे ही वाचा >>NCP : शरद पवारांचा ‘तो’ मोठा दावा प्रफुल पटेलांनी खोडून काढला, म्हणाले…

औषध खरेदीसाठी पैसे नाही

राज्यातील राजकारण एकीकडे प्रचंड वेगाने बदलत आहे. पैशाच्या जोरावर आमदार-खासदारांना खरेदी केले जात आहे. त्यासाठी या सरकारकडे पैसा आहे. मात्र सरकारी रुग्णालयातील औषधोपचारासाठी पैसे नसल्याची टीका सामनातून केली आहे. रुग्णालयामध्ये अपुरा औषधसाठा असल्यामुळे नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपुरातील शासकीय रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोपही सामनातून करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शेम! शेम! शेम!

सामनातून सरकारवर टीका करताना मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी यमाच्या रेड्यावर बसून मौज करणारे हे सरकार अशी टीका करण्यात आली आहे. राज्यात आमदार-खासदारांना विकत घेण्यासाठी मुबलक पैसा आहे, पण शासकीय इस्पितळांत औषध खरेदीसाठी पैसे नाहीत. यमाचा रेडाही हे चित्र पाहून रडत असेल. शेम! शेम! शेम! अशा शब्दात सरकारचा निषेध करण्यात आला आहे.

सरकार निर्दयपणे राजकारणात दंग

नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरु आहे. तरीही हे सरकार राजकारणात मग्न असल्याचे सामनातून म्हटले आहे. राज्यपुढे एवढे मोठे गंभीर संकट आलेले असतानाही राजकारण केले जात असल्यामुळेच सरकारला निर्दयीपणाची उपमा सामनातून दिली आहे.

ADVERTISEMENT

गरीब रुग्ण तडफडून मेले

राज्यातील सामन्य नागरिकांना खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नाही. त्यामुळेच अनेक गोरगरीब लोकं सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेत असतात. मात्र सरकारी रुग्णालयामध्ये सध्या औषधसाठाच अपुरा असल्याचे समोर आले आहे. तरीही हे सरकार योग्य पद्धतीने औषध पुरवठा करत नाही. त्यामुळेच गरीब रुग्ण तडफडून मेल्याचा आरोप सरकारवर केला आहे. भाजपचे काही नागडे

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> India Today conclave mumbai : राष्ट्रवादी कुणाची?, प्रफुल्ल पटेल स्पष्टच बोलले

हे ‘नागडे’ कधी तक्रार करणार

महाविकास आघडीचे सरकार असताना सातत्याने सरकारविषयी तक्रार करणारे किरीट सोमय्या यांचे नाव न घेता सामनातून टीका करण्यात आली आहे. किरीट सोमय्यांनी रुग्णालयातील भ्रष्टाचार कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तसेच कोविडच्या काळातील भ्रष्टाचारावर सातत्याने बोलणारे आता गप्प का आहेत असा सवाल करत त्यांनी हे नागडे याबाबत तक्रार कधी करणार असा खडा सवाल सामनातून केला गेला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT