अवकाळीवरून CM शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा, ‘शेतकरी अडचणीत असताना आम्ही…’
शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यावर आम्ही घरी बसून फक्त आदेश दिले नाहीत, तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली, त्यावरून आता पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
CM Eknath Shinde : गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. मात्र त्या काळात आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिले. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, जनसामान्यांचे असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी काही लोकं अधिवेशनात फक्त टीका करण्यासाठी येतात असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे पिता पुत्रांवर टीका करताना त्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्यावर टीका करताना आम्ही खासगी कामं घेऊन आम्ही दिल्लीला जात नाही अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.
ADVERTISEMENT
…म्हणून दादा आमच्याकडे
हिवाळी अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारचे कामाचा दाखल देत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आम्हीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभाग होण्यापाठीमागे त्यांना शेतकऱ्यांवर झालेला अन्याय सहन न झाल्याने त्यांना आमच्याकडे येण्याचा निर्णय घेतला असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हे ही वाचा >> Lok Sabha: विरोधकांची बोलती बंद, एकाच वेळी 33 खासदार तडकाफडकी निलंबित.. घडलं तरी काय?
शेतकऱ्यांवरून राजकारण नको
शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारने यावेळी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम याच सरकारने केले आहे. त्यामुळे विरोधकांनीही आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राजकारण न करता एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिले पाहिजे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
हे वाचलं का?
खचून जाऊ नका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, 72 कोटी 42 लाख कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे तर 242 कोटी 92 लाखांची तरतूदी आमच्या सरकारने केली आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याने खचून न जाता त्यांनी खंबीर राहून आपल्या कुटुंबालाही साथ द्यावी असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना देण्यात आला.
शेतकऱ्यांसाठी मोठी भरीव मदत
यावेळी शेतकऱ्यांना अनेक समस्या आल्या, अवकाळीचा मोठा फटका यावेळी शेतकऱ्यांना बसला आहे. म्हणून आम्ही फक्त घरात बसून कोणताही निर्णय घेतला नाही तर बांधावर जाऊन आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिलो असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकरी संकटात असताना आम्ही दुसऱ्यांनाही आदेश देण्याचे काम केले नाही तर थेट बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांसाठी मोठी भरीव मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी 32 जिल्ह्यांपैकी 26 जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण करून त्यांना मदत देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> भाजप महाराष्ट्रात नेतृत्व बदलणार?, विनोद तावडेंचं कोणाकडे बोट?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT