Maratha Reservation: ‘तेच मराठा आरक्षणाचे मारेकरी’, मुख्यमंत्री शिंदेंचा थेट उद्धव ठाकरेंवरच आरोप
Maratha Reservation CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका केली आहे. उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी असल्याचा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
Maratha Reservation and CM Eknath Shinde : मुंबई: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून शिवसेना (Shiv Sena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (31 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या याच टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ‘ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी असून आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे.’ अशा शब्दात शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (chief minister eknath shinde criticized shiv sena ubt chief uddhav thackeray over maratha reservation)
ADVERTISEMENT
‘उद्धव ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे’, एकनाथ शिंदेंनी आरक्षणावरून ठाकरेंवर साधला निशाणा
हे ही वाचा >> Maratha Protest: जाळपोळ भोवणार; फडणवीसांनी म्हणाले, “त्या आंदोलकांवर जीवे…”
‘मराठा आरक्षणाची भूमिका मी जाहीरपणे देखील मांडली आहे. त्यामुळे थोडा याला वेळ दिला पाहिजे.. टोकाचं पाऊल उचलून आंदोलनाला गालबोट लागेल अशा प्रकारचं आवाहन सकल मराठा समाजाला करतोय. कारण मराठा समाज हा शांतताप्रिय आणि शिस्तप्रिय आहे. कारण गेल्या वेळेस लाखा-लाखांचे 58 मोर्चे निघाले होते. पण कुठेही हिंसात्मक पद्धतीने आंदोलनं झाली नव्हती.’
‘मराठी बाण्यावर बोलणारे.. खरं तर मराठा आरक्षणावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. कारण मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहेत ते मराठा समाजाला आणि आम्हालाही माहीत आहे.’
‘ज्या काळात देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. त्या काळात ते आरक्षण टिकवण्याचं काम आम्ही आणि देवेंद्रजींनी केलं. पण सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं, उपसमितीचे अध्यक्ष कोण होतं. यांनी हे आरक्षण टिकवलं नाही.’
‘खरं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात. म्हणून तुम्हाला मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक हक्क नाही. तुम्ही मराठा समाजाच्या महिलांच्या मूक मोर्चाला ‘मुका मोर्चा’ला मूक मोर्चा म्हणून हिणवणारे.. कोण होते दे देखील मरााठा समाजाला माहीत आहे.’
‘मराठा समाजाचं आरक्षण घालवायला तुम्ही जबाबदार आहात. आम्ही आरक्षण वाचविण्याचं काम करत आहोत.’
‘ठाकरे हे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत. मराठा आरक्षण जेव्हा हायकोर्टात टिकलं तेव्हा तुम्ही त्यावर किती लक्ष दिलं?, त्यांना किती पुरावे दिले?’
‘मराठा समाज किती मागास आहे याचे तुम्ही पुरावे द्यायला हवे होता. पण ते तुम्ही दिले नाहीत तिथे अपयशी ठरला. या सगळ्या गोष्टी मराठा समाजाला माहिती आहेत. त्यामुळे मराठा समाजाला त्यांनी भडकवू नये.’
‘आमचं सरकार मराठाला समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे. इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता आरक्षण दिलं जाईल. आमचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना पोटदुखी उठली आहे. की, आम्ही करू शकलो.. पण हे करण्याचा प्रयत्न करत आहेत.’ अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरच टीका केली आहे.
हे ही वाचा >> Maratha Reservation: “…तर आज आंदोलनाची वेळच आली नसती”, बावनकुळे ठाकरेंवर भडकले
दरम्यान, आता या टीकेला उद्धव ठाकरे हे नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उद्धव ठाकरेंची टीका…
हे वाचलं का?
उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर बोलताना असं म्हटलं होतं की, ‘हा प्रश्न कायद्याच्या कचट्यातून सुटणार नसेल तर संसदेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवा. कारण कायदा बदलण्याची ताकद संसदेमध्ये आहे. त्यातूनही जर या प्रश्नाकडे पंतप्रधानांकडून दुर्लक्ष केले जात असेल तर राज्यातील 48 खासदारांनी एकजूटीने राजीनामा द्यावा. असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं होतं. यावरच बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्यावर टीका केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT