Eknath Shinde : 'उद्धव ठाकरेंना हाजमोला पाठवावा लागेल'; शिंदेंचा टोमणा

योगेश पांडे

ADVERTISEMENT

political
mahavikas aghadi
social share
google news

Eknath Shinde : 'जो राम का नही वो किसीं काम का नही', म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर रामटेकमधून जोरदार हल्लाबोल चढविला. गेल्या अनेक सभेतून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्यावरून सडकून टीका केली. 

फोटो काढण्यापेक्षा शेती बरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांची तुलना मुघलांबरोबर केली आहे. यावेळी ते म्हणाले की, 'मुघलांना पाण्यात धनाजी-संताजी दिसत होते. तसं यांना मी दिसतो. मी शेतकऱ्याचा मुलगा असून हेलिकॉप्टरमधून फोटो काढण्यापेक्षा शेती केलेली बरी असा खोचक टोला लगावत उद्धव ठाकरे यांना हाजमोला पाठवावी लागेल कारण त्यांना आपलं काम बघवत नाही अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. 

रामावर श्रद्धा दाखवली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले की, 'मी हिंदुत्वाचा भगवा घेऊन तुमच्या पुढे आलो आहे.  मिशन 48 घेऊन आपण पुढे जातो आहे. तसेच आज काही लोक रामाच्या अस्तित्वाबद्दलही सवाल उपस्थित करत आहेत. तसेच ज्यांनी रामावर श्रद्धा दाखवली त्याला मुख्यमंत्री केलं आणि ज्यांनी श्रद्धा दाखवली नाही त्याला घरी बसवलं, असं सांगत जो राम का नही वो किसीं काम का नही' असा जोरदार टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> पवारांनी योगी आदित्यनाथांना इतिहासच सांगितला, 'शिवाजी महाराजांचं कष्ट,कर्तृत्व अन् जिजाऊंचं...'

लहान मुलाप्रमाणं टीका


उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांनी लहान मुलं जसं करतात तशी टीका हे करतात अशी खोचक टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली. 'लहान मुलं जसं म्हणतात तसं हे करत असतात. माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला अशी ही लहान मुलांसारखीही त्यांच्याकडून टीका केली जाते अशा शब्दात उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे. 

राष्ट्रपती राजवट का लावली नाही

विरोधकांनी गुन्हेगारीवरून केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, 'कुठल्याही घटनेला आणि गुन्हेगारीला सरकार पाठीशी घालणार नाही. मात्र आमच्यावर टीका करताना तुमच्या सरकारचे गृहमंत्री जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हा राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी का नाही केली असा सवालही त्यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Abhishek Ghosalkar: विनोद घोसाळकरांनी केली कळकळीची विनंती, 'माझ्या मुलाची विश्वासघाताने हत्या...'

    follow whatsapp

    ADVERTISEMENT