पवारांनी योगी आदित्यनाथांना इतिहासच सांगितला, 'शिवाजी महाराजांचं कष्ट,कर्तृत्व अन् जिजाऊंचं...'

मुंबई तक

'रामदास स्वामींनी दिलेल्या संस्कारांमधूनच त्यांनी पुढे पराक्रम घडवला'अस वक्तव्य योगी आदित्यनाथांनी केले होते, त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी इतिहासातील संदर्भ देत जितामातेचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील योगदान काय होतं ते साऱ्या जगाला माहिती आहे असं मत व्यक्त करत त्यांनी त्यांचा मुद्दाच खोडून काढला.

ADVERTISEMENT

sharad pawar cm yogi
political
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'राजमातेच्या योगदानामुळे छत्रपतींचं व्यक्तिमत्व घडलं'

point

'जिजाऊंचं कर्तृत्व सगळ्या जगाला माहितीय'

point

'राजमातेच्या मार्गदर्शनामुळेच सगळा इतिहास घडला'

Sharad Pawar: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) रविवारी आळंदी दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी 'रामदास स्वामींनी दिलेल्या संस्कारांमधूनच त्यांनी पुढे पराक्रम घडवला' असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) पत्रकारांशी बोलताना योगी आदित्यनाथांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या वक्तव्य खोडून काढत 'आमच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या कर्तृत्वाला राजमाता जिजाऊ (Rajmata Jijamata) यांनी मोठं योगदान दिले असल्याचे सांगत जिजाऊंनीच शिवाजी महाराजांच्या आयुष्याला दिशा दिल्याचेही' त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

छत्रपतींच्या आयुष्याला दिशा

शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी बोलताना त्यांनी सांगितले की, 'छत्रपती शिवाजी महाराज यांचे संबंध व्यक्तिमत्व घडवण्यात आणि त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचं काम हे राजमाता जिजामातांनी केले आहे' अशा शब्दात त्यांनी योगी आदित्यनाथांचा मुद्दा खोडून काढला आहे. 

राजमातेचं मार्गदर्शन

यावेळ त्यांनी सांगितले की, 'सगळ्या जगाला माहिती आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वतःचे कर्तृत्व, स्वतःचे कष्ट, राजमातेचं मार्गदर्शन त्यामुळे हा इतिहास घडला आहे असं सांगत त्यांनी जिजामाता यांचेही योगदान त्यांनी अधोरेखित केले आहे. तरीही काही लोकं वेगळी भूमिका घेतात असा टोलाही त्यांनी लगावला.

हे ही वाचा >> 'राऊत अजून तुमची निर्दोष मुक्तता नाही' शंभूराजांची तंबी

रामदास स्वामींचं मार्गदर्शन

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, 
'रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मार्गदर्शन केले. नंतर महाराजांनी महाराष्ट्र उभा केला. तेच काम आज गोविंदगिरी महाराज करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील जिजामातांचे काय योगदान होते त्यावर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

शरद पवार म्हणाले...

'आमच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वामध्ये राजामाता जिजाऊ यांचे योगदान आहे. संबंध व्यक्तिमत्व घडवण्यात, दिशा देणं हे सगळं काम जिजाऊंनी केले आहे. आणि स्वतःच्या मातेचं कर्तृत्व हे बाजूला टाकून त्याचं श्रेय आणखी कोणाला द्यायचं ही भूमिका काही लोकं घेत आहेत. पण सगळ्या जगाला माहिती आहे. शिवाजी महाराजांचे स्वतःचे कर्तृत्व, स्वतःचे कष्ट, राजमातेचं मार्गदर्शन त्यामुळे हा इतिहास घडलेला आहे.'

हे ही वाचा >> मोहोळच्या पत्नीला धमकी देणारा ससूनमधून पळाला

हे वाचलं का?

    follow whatsapp