"खपवून घेतलं जाणार नाही, कोणीही असो, प्रत्येकावर...", CM देवेंद्र फडणवीस संतोष देशमुख हत्या प्रकरणावर काय म्हणाले?

मुंबई तक

CM Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case : "आमचे सरपंच परिषदेचे लोकंही मला भेटले होते. त्यांनी माझ्याकडे अनेक मागण्या केल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुनाची अतिशय दुर्देवी घटना झाली.

ADVERTISEMENT

CM Devendra Fadnavis Latest Speech
CM Devendra Fadnavis Latest Speech
social share
google news

बातम्या हायलाइट

point

CM देवेंद्र फडणवीसांचं संतोष देशमुख हत्याप्रकरणावर मोठं विधान!

point

"खुनाची अशी घटना कोणत्याही परिस्थितीत..."

point

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

CM Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case : "आमचे सरपंच परिषदेचे लोकंही मला भेटले होते. त्यांनी माझ्याकडे अनेक मागण्या केल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुनाची अतिशय दुर्देवी घटना झाली. अशी घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणीही असो..प्रत्येकावर याठिकाणी कारवाई होईल, हा विश्वास मी तुम्हाला देतो. माझी बीडच्या जनतेला विनंती आहे, आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापन केली. आपल्यालाही सर्वांना याठिकाणी एकत्रितपणे नांदायचं आहे आणि आपण एक नवीन बीड तयार करू. जो इतिहास धस साहेबांनी, ताईंनी (पंकजा मुंडे) सांगितला. एवढे मोठे लोक या बीडने आपल्याला दिलेले आहेत. तोच इतिहास पुढे जाईल आणि एक गौरवशाली असा बीडचा इतिहास तयार करण्यासाठी आपल्या सर्वांच्या प्रयत्नांच्य पाठीशी मी देखील ठामपणे उभा राहील, असं मोठं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टी येथील शासकीय कार्यक्रमात केलं. 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "मी ज्यावेळी मुख्यमंत्री झालो आणि मराठवाड्याच्या हिश्शाचं पाणी मराठवाड्याला द्यायचंय, 23 टीएमसी पाणी आणा. असं सांगितलं तर माझ्यापुढे जेव्हा फाईल आली, त्यावेळी असं लक्षात आलं की, 23 टीएमसी पाणी  हे कागदावर दिसतंय. मुळात 7 टीएमसी पाणी हे उपलब्ध दिसतंय. उरलेलं पाणी हे वापरलेलं दिसतंय किंवा पुढच्या नियोजनात आहे किंवा दुसऱ्या लवादापुढे ते जाणार आहे. तोपर्यंत अनेक कामंदेखील सुरु झाली होती. आपण सगळ्यांनी इथली कामं सुरु केली होती. पाणी धाराशिव जिल्ह्यात पहिले येणार होतं आणि धाराशिवमधून आपल्याकडे पाणी यायचं होतं. त्याचं नियोजनच झालं नव्हतं. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा त्याचा पाठपुरावा करून त्याची एक बैठक घेतली. त्यानंतर सीना-कोळेगावपर्यंत पाणी पोहोचलं".

हे ही वाचा >> Pune News: खळबळजनक! संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंनी स्वत:ला संपवलं! आत्महत्येचं कारण काय?

"आमच्या नवीन सरकारने 2022 च्या ऑक्टोबरमध्ये सगळ्यात पहिले सुप्रमा जर कोणी दिली असेल, तर या प्रकल्पाला आम्ही दिली. अकरा हजार कोटी रुपयांची सुप्रमा दिली. या सर्व नियोजनाकरिता निधी उपलब्ध करून दिला. हे काम अत्यंत वेगाने चाललं आहे. धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील या आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार आहोत. मला विश्वास आहे की, या भागाचा दुष्काळ हा आता भूतकाळ होणार आहे. ज्या गतीनं काम चाललेलं आहे. त्या गतीनं लवकरच आपल्याला हे पाहायला मिळेल की, संपूर्ण परिसर हा बागायती झालेला असेल. आपण पाईप पद्धतीने आजकाल पाणी आणतो", असंही फडणवीस म्हणाले. ेे

हे ही वाचा >> Suresh Dhas: "...त्यांनासुद्धा मोक्का लागला पाहिजे", आष्टीच्या कार्यक्रमात सुरेश धसांची CM फडणवीसांकडे मोठी मागणी

हे वाचलं का?

    follow whatsapp