शिंदेंच्या 'त्या' निर्णयाला CM फडणवीसांकडून स्थगिती, विरोधकांकडून 2800 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
एकनाथ शिंदे यांच्या सरकारने बसेस भाड्याने घेण्याच्या जो निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्थगिती दिली आहे. या निर्णयाचा आढावा घेतल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निर्णय रोखला

विरोधकांकडून घोटाळ्याचा आरोप
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने बसेस भाड्याने घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या घेतलेल्या हा निर्णय अंमलात न आणण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री मागील सरकारच्या इतर निर्णयांचा आढावा घेणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण मिळाले नसल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. या प्रकरणात 2800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
महाराष्ट्र विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले की, या निर्णयात घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी बस भाड्याने घेण्याचा निर्णय नाकारल्याचे वृत्त आम्ही ऐकले आहे, परंतु या संदर्भात कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. "2022 मध्ये, एमएसआरटीसीने इंधनासह प्रति किलोमीटर 44 रुपये दराने बस भाड्याने घेतल्या होत्या."
हे ही वाचा>> Ajit Pawar: अजितदादांच्या आईने पांडुरंगाकडे केली 'ही' मागणी, थेट विठुरायाला घातलं साकडं!
विरोधी पक्षनेत्याकडून घोटाळ्याचे आरोप
अंबादास दानवे म्हणाले, "1,310 बसेसचे भाडे हे इंधनाविना 34.7 ते 35.1 रुपये प्रति किलोमीटर घेण्यात आले होते, तसेच या संदर्भात इरादा पत्रावर स्वाक्षरीही करण्यात आली होती. जर प्रति बस 22 रुपये प्रति किलोमीटर असा हिशोब लावल्यास प्रत्येक बसची किंमत 56 ते 57 रुपये प्रति किलोमीटर असेल, पूर्वीच्या करारानुसार 12-13 रुपयांचा फरक दिसतो, त्यामुळे हा घोटाळा आहे."
बसेस कोणत्या मार्गावर चालवल्या जाणार होत्या?
खरं तर, सप्टेंबर 2024 मध्ये शिंदे गटाचे शिवसेना आमदार भरत गोगावले यांची MSRTC चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. डिसेंबरमध्ये, एमएसआरटीसीने तीन खाजगी कंपन्यांसह LOI (लेटर ऑफ इंटेंट) जारी केले. विशेष म्हणजे भाड्याने मिळणाऱ्या 1310 बसेसपैकी 450 बसेस मुंबई-पुणे, 430 बसेस नाशिक-छत्रपती संभाजी नगर आणि 430 बस नागपूर-अमरावती मार्गावर चालवल्या जाणार होत्या.